चार महिने लोटूनही मजुरांना मजुरी नाही
By Admin | Updated: June 2, 2014 01:27 IST2014-06-02T01:27:04+5:302014-06-02T01:27:04+5:30
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत अनेक कामे सुरू आहेत. तालुक्यात

चार महिने लोटूनही मजुरांना मजुरी नाही
कालीमाटी : महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत अनेक कामे सुरू आहेत. तालुक्यात चार हजारावर मजुर कामावर आहेत, पण महिने लोटूनही मजुरी मिळत नसल्याने कामे जवाहर विहीरींचे काम थंडबस्त्यात आहे. आमगाव पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर अनेक प्रकारचे कामे सुरू आहेत. या योजनेपासून अकुशल मजुरांना रोजगार मिळावा म्हणून सदर योजनेचा आराखडा तयार करण्यात आला. प्रत्येक हाताला काम तर मिळाले पण प्रश्न मजुरीचा योजना चांगली आहे पण राबविणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांना येणार्या तांत्रीक अडचणी यामुळे महिने लोटून जातात पण मजुरांच्या बँक खात्यात मजुरी जमा करीत नाही. यामुळे मजुर वर्गालाही पोट भरणे अवघड झाले आहे. मात्र प्रशासनाला ही दयनिय अवस्था दिसत नाही. कालीमाटी येथील ग्रा.पं. न खाजगी विंधन विहिरी चे कामे सुरू केले. पण तीन ते चार महिने लोटूनही मजुरांना मजुरी मिळाली नाही. गरजू मजूर दररोज आपले बँक खाते तपासून घेतात. पण मजुरांच्या खात्यात मजुरीची रक्कम अद्याप जमा झाली नसल्याचे मजुरांना सांगितले. त्यामुळे पुढील विहिरीचे कामे बंद करण्यात आले. सध्या पावसाळा सुरू होत असल्याने सदर विहीर बुझण्याचा मार्गावर आहे. त्या ठिकाणी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर विंधन विहिरीसंबंधीचे मस्टर पंचायत समितीकडून जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात आली पण बँकिंग प्रणालीमुळे मजुरांचे पेमेंट मिळण्यास विलंब होत असल्याचे विस्तार अधिकारी खोटेले यांनी सांगितले. विकासमुखी रोहयोच्या या योजनेत मजुरी या प्रश्नांनी बारा वाजविले आहे. या योजनेतील बँकीग व्यवहार जिल्हास्तरावर प्रलंबित आहे ते तत्काळ निवारण करण्याची मागणी लक्ष्मण चौधरी, पुरूषोत्तम हरिणखेडे, शकुंतला चौधरी, महेंद्र चौधरी, देवका फुंडे, कैलास चौधरी, चंद्रशेखर फुंडे, तेजराम बहेकार, भोजू बहेकार यांनी केली आहे. (वार्ताहर)