लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील कचरा लगतच्या ग्राम फुलचूरटोला येथील हद्दीत टाकत असताना फुलचूरटोला ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांनी नगर परिषदेच्या चार कचरागाड्या (ऑटो टिप्पर) पकडल्या. शनिवारी (दि.८) दुपारी १.३० वाजता दरम्यान हा प्रकार घडला. विशेष म्हणजे, यापुर्वी फुलचूर ग्रामपंचायतने नगर परिषदेचे दोन ट्रॅक्टर पकडले होते व त्यांना दंड ठोठावला होता.नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्यामुळे शहरात निघणारा कचरा मोक्षधाम परिसरात टाकला जातो. याशिवाय, कित्येकदा कचरा मोक्षधाम परिसराला लागूनच ग्राम फुलचूरच्या हद्दीत टाकला जातो. असाच प्रकार पुन्हा एकदा घडला असून फुलचूर गावच्या हद्दीत कचरा टाकताना सरपंच जीवन बंसोड, सदस्य श्याम कावडे, दिनेश तिडके, गंगाराम बावनकर, कर्मचारी सत्यम सोनवाने, संदीप ठवरे आदिंनी शनिवारी (दि.८) नगर परिषदेच्या चार कचरागाड्या पकडल्या. विशेष म्हणजे, या चार गाड्या पकडण्यात आल्या तेव्हा दोन गाड्या घेऊन चालक पसार झाला. यावर ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांनी चारही गाड्या जप्त करून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभ्या केल्या. चारही गाड्यावर प्रत्येकी १० हजार रुपयांप्रमाणे ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला.विशेष म्हणजे, फुलचूरटोला ग्रामपंचायतने यापुवीर्ही नगर परिषदेचे दोन ट्रॅक्टर पकडून दंड ठोठावला आहे. त्यानंतर पुन्हा आता तोच प्रकार घडला आहे.प्रकल्पाअभावी न.प.ची अडचणनगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्यामुळे कचरा टाकावा कोठे असा प्रश्न पडत आहे. परिणामी स्वच्छता विभागाकडून फुलचूर गावच्या हद्दीत कचरा टाकला जातो. त्यात आता काही दिवसांपूर्वी लगतच्या ग्राम चुलोद परिसरात कचरा टाकण्यात आला होता. यामुळे स्वच्छता विभागाची कचरा टाकण्यासाठी चांगलीच कसरत होत आहे.
नगर परिषदेच्या चार कचरागाड्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:00 IST
नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्यामुळे शहरात निघणारा कचरा मोक्षधाम परिसरात टाकला जातो. याशिवाय, कित्येकदा कचरा मोक्षधाम परिसराला लागूनच ग्राम फुलचूरच्या हद्दीत टाकला जातो.
नगर परिषदेच्या चार कचरागाड्या जप्त
ठळक मुद्देफुलचूरटोला ग्रा.पं.ची कारवाई । गावच्या हद्दीत कचरा टाकताना पकडले