शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पोलिस-नक्षल चकमकीत चार जहाल महिला नक्षलवादी ठार: होतं ६२ लाख रुपयांचं बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 21:06 IST

चकमकीत ठार झालेल्या चारही महिला नक्षलवाद्यांची ओळख पटली असल्याची माहिती बालाघाट झोनचे पोलिस महासंचालक संजय सिंह यांनी गुरुवारी (दि.२०) बालाघाट येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

गोंदिया : हॉकफोर्स, पोलिस आणि नलक्षवादी यांच्या झालेल्या चकमकीत चार जहाल महिला नक्षलवादी ठार झाल्याची घटना बुधवारी (दि.१९) घडली. चकमकीत ठार झालेल्या महिला नक्षलवाद्यांवर ६२ लाख रुपयांचे बक्षीस होते. चकमकीत ठार झालेल्या चारही महिला नक्षलवाद्यांची ओळख पटली असल्याची माहिती बालाघाट झोनचे पोलिस महासंचालक संजय सिंह यांनी गुरुवारी (दि.२०) बालाघाट येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.चकमकीत ठार झालेल्या महिला नक्षलवाद्यांमध्ये आशा कान्हा भोरमदेव (एरिया कमेटी कमांडर), शीला, रंजीता, लख्खे कान्हा भोरमदेव आदींचा समावेश होता. या सर्वांवर विविध नक्षली कारवाई प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या चारही महिला नक्षलवादी छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे पुढे आले आहे. या चकमकीची माहिती देताना पोलिस महासंचालक संजय सिंह यांनी सांगितले गढी सूपखार वन परिक्षेत्रातील रौंदा फॉरेस्ट कॅम्पजवळ १९ फेब्रुवारी रोजी ही चकमक झाली. या चकमकीत काही नक्षलवादी ठार झाले. तर काही नक्षलवादी पळून गेले. या जंगलात हॉकफोर्स, पोलिस विभागाचे १२ पथकातील जवळपास ५०० जवानांचा समावेश होता. यात चार महिला नक्षलवादी ठार झाल्या तर काही नक्षलवादी जखमी झाले असून ते घनदाट जंगलाचा आधार घेत पळून जाण्यात यशस्वी झाले.अशी झाली चकमकबालाघाटचे पोलिस अधीक्षक नागेंद्र सिंह यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की नक्षल कमांडर आशा ही लगतच्या छत्तीसगड राज्यातील रहिवासी आहे. मध्यप्रदेशच्या मंडला येथे कान्हा व्याघ्र प्रकल्प व छत्तीसगड राज्यातील कवर्धा जिल्ह्यातील भोरमदेव वन्यजीव अभयारण्य ती एका नक्षल दलमचे नेतृत्व करीत होती. या दलमला ‘केबी’ असे म्हटले जात होते. ती १९ फेब्रुवारी रोजी सूपखार वन परिक्षेत्रातील रौंदा फॉरेस्ट परिसरात आपल्या १० ते १५ साथीदारांसह शस्त्र घेवून आली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याच माहितीच्या आधारावर हॉकफोर्स व जिल्हा पोलिस दलाला या परिसरात सर्च ऑपरेशन करण्यासाठी पाठविण्यात आले होते.

रौंदा फारेस्ट कॅम्प परिसरात झाली चकमकगढी सूपखार वन परीक्षेत्रातील रौंदा फारेस्ट कॅम्प परिसरात सर्चिंग करीत असलेल्या जवानावर नक्षलवाद्यांनी अचानक फायरिंग सुरु केली. हॉकफोर्सच्या जवानांनी नक्षलवाद्यांना आत्मसर्मपण करण्याचे आवाहन केले. मात्र नक्षलवाद्यांनी पोलिस जवानाच्या दिशेने सातत्याने फायरिंग सुरुच ठेवली. यानंतर यानंतर हॉकफोर्स व पोलिसांनी याला प्रत्युत्तर फायरिंग केली. यात चकमकीत चार जहाल महिला नलक्षवादी ठार झाल्या.नक्षलवाद्यांकडून ही शस्त्रे केली जप्त -हॉकफोर्स व पोलिस जवानांनी नक्षलवाद्यांजवळून एक इन्सास रायफल, एक एसएलआर रायफल, एक ३०३ रायफल व दैनदिन उपयोगाच्या वस्तू जप्त केल्या. ही मोहीम राबविणाऱ्या हॉकफोर्स व पोलिस जवानांचे पोलिस महासंचालक व पोलिस अधीक्षक यांनी कौतुक केले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीDeathमृत्यूPoliceपोलिसSoldierसैनिक