रस्ता दुरूस्तीसाठी चार कोटींचा निधी
By Admin | Updated: November 15, 2014 22:49 IST2014-11-15T22:49:48+5:302014-11-15T22:49:48+5:30
बोंडगावदेवी प्रभागाचे नेतृत्व करणारे जिल्हा परिषद सदस्य अरविंद शिवणकर यांनी जिल्हास्तरावर शर्तीचे प्रयत्न करून परिसरातील रस्त्यांच्या खडीकरण, डांबरीकरण व सिमेंटीकरणासाठी चार कोटींचा

रस्ता दुरूस्तीसाठी चार कोटींचा निधी
बोंडगावदेवी : बोंडगावदेवी प्रभागाचे नेतृत्व करणारे जिल्हा परिषद सदस्य अरविंद शिवणकर यांनी जिल्हास्तरावर शर्तीचे प्रयत्न करून परिसरातील रस्त्यांच्या खडीकरण, डांबरीकरण व सिमेंटीकरणासाठी चार कोटींचा निधी मंजूर करवून घेतला आहे.
प्रभागातील काही रस्त्यांची दयनिय अवस्था झाली होती. ग्रामस्थांना होणारा त्रास लक्षात घेऊन जि.प. सदस्य अरविंद शिवणकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. शिवणकर यांचे प्रयत्न सार्थकी झाले. जिल्हा वार्षिक योजनेतून रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी निधी मंजूर करण्यात अखेर यश आले. परिसरातील रस्त्याचा निश्चितच कायापालट होणार आहे. परिसरातील काही रस्त्यांची अत्यंत दयनिय अवस्था झाली होती. जेव्हापासून डांबरीकरण झाले त्या रस्त्याकडे कोणीही नजरच फिरविली नाही. अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडून मोठे भगदाड पडलेले आजघडीला दिसतात. सदर रस्त्यावरून ये-जा करणे कठीण झाले होते. काही मार्गावरून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. सदर रस्त्याची खस्ता झाल्याचे ग्रामस्थांनी जि.प. सदस्य अरविंद शिवणकर यांच्या लक्षात आणून दिले. जिल्हास्तरावर सातत्याने पाठपुरावा करून शिवणकर यांनी परिसरातील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आले. मंजुर झालेल्या निधीमध्ये येरंडी ते बाक्टी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १० लाख, खांबी ते इंझोरी रस्त्यासाठी ५ लाख, दाभना ते अर्जुनी ५ लाख, पिंपळगाव ते सावरटोला रस्त्यासाठी १५ लाख, इंझोरी ते बोरटोला रस्त्याच्या खडीकरणासाठी १३ लाख, सीडी वर्कसाठी ७ लाख, डांबरीकरणासाठी ५ लाख, बोंडगावदेवी- बोदरा रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी १५ लाख, जिल्हा वार्षिक योजनेच्या ३०-५४, एफडीआर योजनेंतर्गत मंजूर झाले. १३ व्या वित्त आयोगातून अरततोंडी १.७७ लाख, घुसोबाटोलाचे १ लाखाचा निधी, सुकळीफाटा, दाभना अरततोंडी, पिंपळगाव-चाप्टी येथील काम मंजूर करण्यात आले.