चार अपघात, एक ठार
By Admin | Updated: January 1, 2015 23:04 IST2015-01-01T23:04:40+5:302015-01-01T23:04:40+5:30
‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्यासाठी जात असताना कार अपघातात एका तरूणाचा मृत्यू झाला तर सोबत असलेला दुसरा तरूण गंभीर जखमी झाला. यासोबतच इतर तीन अपघात पाच जण जखमी झाले.

चार अपघात, एक ठार
कार पुलावर धडकली: ‘थर्टी फर्स्ट’च्या आनंदावर विरजण
देवरी : ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्यासाठी जात असताना कार अपघातात एका तरूणाचा मृत्यू झाला तर सोबत असलेला दुसरा तरूण गंभीर जखमी झाला. यासोबतच इतर तीन अपघात पाच जण जखमी झाले.
आमगाव येथील धम्मगिरी पहाडीजवळ ३१ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजतादरम्यान कारला अपघात घडला. त्यात अंशुल उर्फ बट्टू अनिल अग्रवाल (२९, रा.देवरी) हे ठार झाले.
देवरी येथील व्यापारी व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सहसचिव अनिल अग्रवाल यांचा धाकटा मुलगा अंशुल अग्रवाल हा त्यांचा मुनिम गौरीशंकर भिवाजी वासनिक (३५,रा.मरामजोब) याला घेऊन हुंडई कार (एमएच ३५/पी ४६३१) ने थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी गोंदियाला येत होता. मात्र भरधाव वेगात असलेली कार धम्मगिरी पहाडीजवळ पुलाच्या पिलरला धडकली. यामध्ये अंशुलचा जागीच मृत्यू झाला. गौरीशंकर हा गंभीर जखमी झाला असून त्याला गोंदिया व नंतर नागपूरला खाजगी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. आमगाव पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.
पती-पत्नी जखमी
देवरी- आमगाव तालुक्यातील ग्राम कवडी निवासी दाप्मत्य अपघातात जखमी झाल्याची घटना ३१ डिसंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता दरम्यान आमगाव-देवरी राज्य मार्गावर घडली. खेमराज तुळशीराम बागडे (३९) व त्यांच्या पत्नी पुस्तकला (३२) मुरदोली येथील साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपून दुचाकी (एमएच ३५/एच५७७४) ने परत येत असताना त्यांना मागून येत असलेल्या फियाट कार (एमएच३१/एच ००८५) ने धडक मारली. यामध्ये दोघे जखमी झाल्याने त्यांना देवरी येथील ग्रामीण रूग्णालयात भर्ती करण्यात आले.
अपघातात जखमी
चिचगड येथे घडलेल्या अपघातात ममता विश्वनाथ नखाते (३०,रा.देवरी) या ३१ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजतादरम्यान जखमी झाल्या. त्यांना उपचारार्थ रात्री ८.२० वाजतादरम्यान येथील केटीएस रूग्णालयात भर्ती करण्यात आले. महेंद्र धनलाल भूरे (२७,रा.बाम्हणी) हे सुद्धा अपघातात जखमी झाल्याने त्यांनाही केटीएस रूग्णालयात भर्ती करण्यात आले आहे.
दुचाकीची टक्कर
गोंदिया-सडक अर्जुनी मार्गावर दुचाकी क्रमांक एमएच३६/यु ६७२२ तसेच एमएच ३१/वाय ७५३७ यांची आपसात धडक लागल्याने दोघे जखमी झाले. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता दरम्यान हा अपघात घडला. (शहर प्रतिनिधी)