शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.चे माजी उपाध्यक्ष पंचम बिसेन राष्ट्रवादीत

By admin | Updated: February 9, 2015 23:15 IST

गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे व केंद्र तसेच राज्यात आपले वजन खर्च करून जिल्ह्याच्या विकासासाठी निधी खेचून आणणारे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार

गोंदिया : गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे व केंद्र तसेच राज्यात आपले वजन खर्च करून जिल्ह्याच्या विकासासाठी निधी खेचून आणणारे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पंचम बिसेन यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बिसेन यांच्यासोबतच आमगाव, सालेकसा व देवरी तालुक्यातील अनेक भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यानीही खा.पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामुळे नजिकच्या भविष्यात जिल्ह्याचे राजकीय चित्र बदलण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.खा.पटेल यांनी आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात आपला लोकसभा मतदार संघात अदानी, भेलसारखे हजारो कोटी रुपये किमतीचे औद्योगिक प्रकल्प आणले. धापेवाडा, बावनथडी, गोसेखुर्दसारखे सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावले. सिंचन, उद्योग व शिक्षण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यासोबत समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न पटेल यांनी केल्याने त्यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात असल्याचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यांच्या तळमळीतून जिल्ह्याला विकासाची दिशा मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे प्रफुल पटेल यांनी स्वागत करून जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी पंचम बिसेन यांच्यासह राकाँत जाणाऱ्यांमध्ये सालेकसाचे माजी पं.स.सभापती तुकाराम बोहरे, माजी जि.प. सदस्य रामेश्वर पंधरे, केशवराव भुते, कृष्णा कोरे, उपसरपंच तिरथ येटरे, लिलाधर बहेकार, नरेंद्र शिवणकर, देवेंद्र मच्छिरके, जलालभाई पठाण, राजाराम शिवणकर, रविशंकर हत्तीमारे, अनिरूध्द शेंडे, गुड्डु कोरे, अंतरीक्ष बहेकार, धनराज बानेवार, रामेश्वर भांडारकर, उत्तम चर्जे, बळीराम कोरे, मादोप्रसाद मिश्रा, अब्बासभाई सय्यद, सुजीत अग्रवाल, नेमीचंद खंडाते, दिनेश नेताम, लोकेश नेताम, प्रेमलाल नेताम, देवेंद्र निज्ञनार्थी, विनोद गिरी, सुमित गिरी, दीपक वैद्य, किशोर कोहळे, नितीन मेश्राम, राहुल उके, कोमल वैद्य, राकेश नेताम, हंसराज रहिले, कुंडलिक बंसोड, जावेद खान, विक्की मस्के, शेहबाज कुरैशी आदींचा समावेश आहे. भाजपच्या नेत्यांमुळे कार्यकर्त्यांचा झालेला भ्रमनिरास यामुळे अनेकांनी हे पाऊल उचलले आहे. प्रफुल्ल पटेलांच्या नेतृत्वावर त्यांनी टाकलेला विश्वास यामुळे जिल्ह्याचा विकास घडून येईल, असा विश्वास आमदार राजेंद्र जैन यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी रमेश ताराम, देवेंद्रनाथ चौबे, ओबीसी संगठना जिल्हा अध्यक्ष बबलू कटरे, तालुका अध्यक्ष प्रभाकर दोनोडे, गोपाल तिवारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)