पटेलांच्या सल्ल्यावरून होणार रेल्वे समितीचे गठन

By Admin | Updated: September 26, 2015 01:49 IST2015-09-26T01:49:00+5:302015-09-26T01:49:00+5:30

देशातील रेल्वेच्या १६ झोनमध्ये भंग करण्यात आलेल्या झेडआरयुसीसी या रेल्वेच्या झोनल कमिटीचे पुनर्गठन करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.

The formation of the Railway Committee will be on the advice of Patel | पटेलांच्या सल्ल्यावरून होणार रेल्वे समितीचे गठन

पटेलांच्या सल्ल्यावरून होणार रेल्वे समितीचे गठन

गोंदिया : देशातील रेल्वेच्या १६ झोनमध्ये भंग करण्यात आलेल्या झेडआरयुसीसी या रेल्वेच्या झोनल कमिटीचे पुनर्गठन करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. नागरिकांकडून येणाऱ्या रेल्वेच्या समस्या जाणून घेण्यासाठी या समित्यांचे गठन होणे गरजेचे असून त्यासाठी रेल्वे प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी सूचना माजी केंद्रीय मंत्री खा.प्रफुल्ल पटेल यांनी केली होती.
आॅक्टोबर महिन्यात दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सत्येंद्रकुमार यांच्या उपस्थितीत नागपूर मंडळाअंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील केंद्रीय मंत्री आणि खासदारांची बैठक होणार आहे. त्या बैठकीत कोणत्या विषयांना हात घातला पाहीजे याबाबतच्या सूचना खा.पटेल यांनी रेल्वे प्रशासनाकडे केल्या. त्यात प्रामुख्याने झेडआरयुसीसी कमिट्यांचे गठन करण्याचीही सूचना त्यांनी केली होती.
लोकांचे प्रतिनिधी म्हणून खासदार या कमिटीत असले तरी सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या रेल्वेच्या सर्व समस्या रेल्वे प्रशासनाला कळाव्या यासाठी ही समिती महत्वपूर्ण ठरत असल्याचे खा.पटेल यांनी म्हटले होते. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The formation of the Railway Committee will be on the advice of Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.