नगर पंचायतीच्या दर्जासाठी प्रारूप
By Admin | Updated: May 20, 2014 23:42 IST2014-05-20T23:42:57+5:302014-05-20T23:42:57+5:30
लोकसंख्येच्या प्रमाणात विकासाची गती मिळावी यासाठी शासनाने मागील हिवाळी अधिवेशनात राज्यातील १३८ ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा मिळावा यासाठी निर्णय घेण्यात आला.

नगर पंचायतीच्या दर्जासाठी प्रारूप
अधिसूचना निघाली
यशवंत मानकर - आमगाव
लोकसंख्येच्या प्रमाणात विकासाची गती मिळावी यासाठी शासनाने मागील हिवाळी अधिवेशनात राज्यातील १३८ ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा मिळावा यासाठी निर्णय घेण्यात आला. यासंबंधी शासनाने प्रारुप अधिसूचना काढली आहे. त्यामुळे नगर पंचायतीच्या निवडणूकपूर्वी ग्रामपंचायतींवर पुढील दोन महिन्यात प्रशासक नेमण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्य शासनाने ग्रामपंचायतअंतर्गत वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात गाव विकासाचे महत्वपूर्ण धोरण ठेवत यासाठी राज्यातील १३८ ग्रामपंचायतींना हिवाळी अधिवेशनात नगर पंचायत देण्यात येईल, असा निर्णय घेतला होता. या निर्णयाने सर्वच स्तरातून स्वागत करण्यात आले होते. राज्यातील ग्रामपंचायतींना नगर पंचायतचा दर्जा देण्यासंदर्भात शासनाने प्रारुप अधिसूचना नगर विकास विभाग मंत्रालयाने काढली. याविषयी विविध महत्वपूर्ण बाबींचा समावेशासंबंधी व प्रारुप अधिसूचनेसंदर्भात व्हिडीओ कॉन्फरंसने मुख्य सचिवांनी मार्गदर्शन केले. यात विविध बाबी अंतर्भूत व्हावी यासाठी अधिसूचना काढण्यात आली. शासनाकडून नगर पंचायतींच्या प्रारुप अधिसुचनेवर नागरिकांकडून अभिप्राय मागण्यात आले आहे. ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे क्षेत्र आणि तालुका मुख्यालय असल्यामुळे हे संक्रमणात्मक क्षेत्रातील लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्र, संक्रमित गावापासून नगर पंचायतीचे अंतर, नगर पंचायतीमध्ये संक्रमिक ग्रामपंचायत, नगर पंचायतीचा दर्शक नकाशा व ग्रामपंचायतचे अभिप्राय मागविण्यात आले आहे. सदर प्रारूप अधिसूचनेप्रमाणे नगर पंचायत संबंधीची माहिती संबंधित ग्रामपंचायतने ६ जूनपर्यंत शासनाकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यासंबंधी पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी व तहसीलदार यांना सूचना करण्यात आल्या आहेत. राज्यात नव्याने १३८ ग्रामपंचायत पुढे नगर पंचायतीचा दर्जा स्विकारण्यात सक्षमपणे पुढे आले आहेत. गावपातळीवरुन थेट नगर पंचायतचा कारभार येणार असल्याने नागरिकांमध्ये उत्साह वाढला आहे. नव्याने गठित होणार्या नगर पंचायतमध्ये गोंदिया जिल्ह्यातील सहा तालुका समाविष्ट करण्यात आले आहे. यात अनेकांनी नगर पंचायतच्या अधिसुचनेला पाठिंबा देत शासनाला अभिप्राय पाठविले आहे. त्यामुळे पुढील जुनमध्ये शासनस्तरावर राज्यातील १३८ नगर पंचायतमध्ये गोंदिया जिल्ह्यातील आमागव, गोरेगाव, देवरी, सालेकसा, सडक/अर्जुनी, मोरगाव अर्र्जुनी या तालुका मुख्यालय आता ग्रामपंचायतपासून नगर पंचायतीचा पुढचा प्रवास सुरू होणार आहे. त्यामुळे या तालुक्याच्या नगर पंचायतीमधील निवडणूक पूर्ण प्रशासकांच्या हालचालींना वेग आला आहे.