शेतकरी कर्जासह पाण्याचे देयक माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 21:35 IST2017-09-01T21:35:39+5:302017-09-01T21:35:58+5:30

महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाद्वारे (मजीप्रा) गोरेगावात घरोघरी जावून देयक वसुलीचे कार्य केले जात आहे.

Forgive water payment with farmer loan | शेतकरी कर्जासह पाण्याचे देयक माफ करा

शेतकरी कर्जासह पाण्याचे देयक माफ करा

ठळक मुद्देमजीप्राचे देयक वसुली अभियान : गोरेगावच्या शेकडो ग्राहकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाद्वारे (मजीप्रा) गोरेगावात घरोघरी जावून देयक वसुलीचे कार्य केले जात आहे. मजीप्राचे अधिकारी जेव्हा देयक वसुलीसाठी ग्राहकांच्या घरी जातात तेव्हा ‘शेतकºयांचे कर्ज माफ केले त्याप्रमाणे पाण्याचे देयकही माफ करा’ असा ग्राहकांचा आग्रह पाहून त्रस्त होवून जातात. ग्राहकांना कोणते उत्तर द्यावे व कोणते देवू नये? अशा विचारात सदर कर्मचारी चुप्पी साधतात.
सद्यस्थितीत मजीप्राकडून विशेष वसुली अभियान राबविण्यात येत आहे. चार लोकांची एक चमू तयार करण्यात आली आहे. गोरेगावात घरोघरी जावून ग्राहकांच्या भेटी घेतल्यावर एका महिन्यात २० हजार रूपयांची वसुली वाढली आहे. आतापर्यंत प्रति महिना सरासरी ६० हजार रूपये वसूल होत होते. विशेष वसुली अभियान मार्च महिन्यापर्यंत चालविण्यात येईल. तेव्हाच विशेष वसुली अभियानाची सार्थकता माहिती होईल. मागील वर्षी याच प्रकारचे अभियान राबविण्यात आले होते. तेव्हा १६.१४ लाख रूपयांची वसुली झाली होती. त्यावेळी गोरेगावच्या संपूर्ण योजनेत सर्व ग्राहकांवर पाणी पुरवठ्याचे १८.९९ कोटी रूपये बाकी होते.
सन २००७ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेच्या तात्काळ नंतर त्यावेळच्या सरकारने शेतकºयांसाठी कर्जमाफीची मागणी केली होती. केव्हातरी कर्जमाफी होईल, हाच विचार करून गोरेगावच्या शेतकºयांनी जोडणी तर घेतली पण देयकच भरले नाही. जोडणी घेतल्यानंतर आजपर्यंत देयक न भरणाºया ग्राहकांनी संख्या मोठी आहे. आता पुन्हा कर्जमाफी झाली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
विशेष म्हणजे आर्थिक वर्ष २०१६-१७ दरम्यान गोरेगावच्या पाणी पुरवठा योजनेचे एक लाख २२ हजार ६२४ रूपयांचे देयक एक हजार ८५५ ग्राहकांवर आहे. या ग्राहकांवर मागील १९ लाख १७ हजार ९५२ रूपये बाकी आहेत. बाकी रकमेवर सहा लाख ३७ हजार ९०० रूपयांचे व्याजही वाढले आहे. अशाप्रकारे गोरेगावच्या ग्राहकांवर २६ लाख ७८ हजार ४७६ रूपयांचे पाणी पुरवठ्याचे बिल बाकी आहे. आता ज्याप्रकारे कर्जमाफी झाली त्याचप्रकारे देयकसुध्दा माफ करण्यात यावे, अशी ग्राहकांची मागणी आहे.

गोरेगावच्या पाणी पुरवठा योजनेतून लाभान्वित ग्राहकांच्या गोष्टी ऐकून आश्चर्य होते. कर्ज माफी झाली तर त्यांचे देयक केव्हा माफ होतील, असे ते विचारतात. माझ्याकडे याबाबत कसलेही उत्तर नाही. वसुलीसाठी गेल्यानंतर ग्राहकांच्या मानसिकतेत बदल होते. ग्राहक देयक भरत आहेत. गती संथ असली तरी पूर्वीपेक्षा बरी आहे.
-राजेंद्र मडके,
उपविभागीय अभियंता, मजीप्रा गोंदिया-गोरेगांव

Web Title: Forgive water payment with farmer loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.