वन कर्मचारी खुर्ची लावून घेतात ‘सावजा’चा शोध

By Admin | Updated: December 3, 2015 02:16 IST2015-12-03T02:16:42+5:302015-12-03T02:16:42+5:30

तालुक्यात विर्सी येथे वनक्षेत्राधिकारी यांचे कार्यालय आहे. नगरातील आंबेडकर चौकातील वनचौकीत

The forest staff manages the chair | वन कर्मचारी खुर्ची लावून घेतात ‘सावजा’चा शोध

वन कर्मचारी खुर्ची लावून घेतात ‘सावजा’चा शोध

वनरक्षकाची उर्मटगिरी : आंबेडकर चौकातील वनचौकी
आमगाव : तालुक्यात विर्सी येथे वनक्षेत्राधिकारी यांचे कार्यालय आहे. नगरातील आंबेडकर चौकातील वनचौकीत वनरक्षकांची उर्मटगिरी अनेक दिवसांपासून सुरू आहे. वनचौकीत काही वनकर्मचारी खुर्च्यावर बसून टवाळक्या करीत असतात व त्यातच सावजाच्या शोधात राहतात. कोणी ग्राहक मिळाला की त्याच्याकडून नियमबाह्य वसुली करतात. येथील एका वनरक्षकामुळे शासनाचा महसूल बुडत असून अवैध प्रकाराला ऊत आला आहे.
आंबेडकर चौकातील वनचौकीत नगरातील एक वनरक्षक कार्यरत आहे. त्याची पत्नी जवळच नोकरीला असल्याने तो आपल्या सोयीनुसार वनविभागात नोकरी करतो. एखाद्या मेटॅडोरमधून किन्हीचे तयार केलेले साहित्य नेले व त्यावेळी गाडी चालकाकडे टी.पी. नाही तर त्याच ठिकाणी टी.पी. येईपर्यंत गाडी उभी करायला हवी. मात्र या उर्मट वनरक्षकाने आपणाला काही चिरीमिरी मिळत नाही, असे समजताच आपली दगंबगिरी दाखदिली. रजिस्टवर काहीच नोंद न करता गाडी सोडली. मात्र रस्त्यात कोणी पकडले तर आपण जबाबदार राहणार नाही, असे सुचविले. मात्र गाडी गेल्यानंतर या चतुर व चानाक्ष वनरक्षकाने समोरील मार्गावरील अधिकाऱ्यांना सांगितले.
गाडीचालक किंवा माल घेणाऱ्याला या चालाक वनरक्षकाची चाल ओळखला आली नाही. समोरील अधिकाऱ्यांनी गाडी पकडली व देवरी येथल वन अधिकाऱ्यांनी चक्क १० हजार रुपये घेऊन गाडी रात्रभर सावली येथे नेवून सोडली.
या आंबेडकर चौकातील वनचौकीत अनेक गालेबोटे चालतात. रात्री मेटॉडोअर किंवा ट्रकमधून अवैध उपजाऊ लाकूड चोरुन निर्यात होतो. यात अनेकांचे हित गुंतले आहेत. सदर प्रकरणाबाबत विर्सी येथील वनक्षेत्राधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा फोन बंद होता. या चौकीसमोर रात्री मोठ्या प्रमाणात अवैध लाकडाची चोरी होते. मात्र सांठगाठमधून जसे काही होत नाही असा देखावा दाखवितात. नगरातील हा उर्मट वनरक्षक मनमर्जीने काम करीत आहे. याच्यावर तात्काळ कारवाई करुन त्याला हटविण्याची मागणी अनेकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The forest staff manages the chair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.