शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

सारसांच्या सुरक्षेसाठी वन कर्मचारी घालणार गस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2022 9:21 PM

जिल्ह्यात सारस आणि परदेशी पाहुण्या पक्ष्यांनी तळ ठोकला आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून जिल्ह्यात पोहोचलेल्या परदेशी पाहुण्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वन विभागाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. गोंदियात सारस पक्ष्यांसोबत विदेशी पक्षीही वावरत असल्याचे उल्लेखनीय आहे. पक्षी संस्कृती आणि त्यांच्या अधिवासावर आता वन विभागाकडून बारीक लक्ष ठेवले जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया  : गोंदिया जिल्ह्याचे वैभव असलेल्या सारस पक्ष्यांच्या संवर्धनाकडे वन विभागाचे काहीसे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे या पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले होते. याची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दखल घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनासह वन विभागानेदेखील उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात सारस पक्ष्यांचा अधिवास असलेल्या परिसरात वन विभागाचे कर्मचारी गस्त घालणार असून, त्यांच्या संवर्धनासाठी उपाययोजना करणार आहेत. जिल्ह्यात सारस आणि परदेशी पाहुण्या पक्ष्यांनी तळ ठोकला आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून जिल्ह्यात पोहोचलेल्या परदेशी पाहुण्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वन विभागाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. गोंदियात सारस पक्ष्यांसोबत विदेशी पक्षीही वावरत असल्याचे उल्लेखनीय आहे. पक्षी संस्कृती आणि त्यांच्या अधिवासावर आता वन विभागाकडून बारीक लक्ष ठेवले जात आहेत. सुरक्षेसाठी वन विभागाचे पथक दिवस-रात्र व वेळोवेळी अधिवास क्षेत्रात गस्त घालत असते. जेणेकरून पक्षी सुरक्षित राहील. विशेष म्हणजे, शिकारी, विद्युत प्रवाह आणि विषारी अन्न खाल्ल्याने आतापर्यंत अनेक सारस आणि विदेशी पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील परसवाडा आणि झिलमिली तलावाच्या काठावर सारस पक्षी आढळतात. जे गोंदियाचे वैभव आहे. विदेशी पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून डिसेंबर महिन्यापासून झिलमिली आणि परसवाडा तलावात पोहोचतात. सारस पक्षी दिसण्यासाठी आणि पक्षी संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाकडून  विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. 

विदर्भात गोंदिया जिल्ह्यात सारस पक्ष्यांचे दर्शन होते. तर विदेशी पक्ष्यांचेही आगमन जिल्ह्यात होत असते. त्यामुळे निसर्गप्रेमींसह पक्षीप्रेमींसाठी हिवाळ्याचे दिवस पर्वणीचेच असतात. सध्या जिल्ह्यात सारस पक्ष्यांसह विदेशी पाहुण्या पक्ष्यांचेही आगमन झाले आहे. तेव्हा या पक्ष्यांविषयी जनजागृती मोहीम सुरू करुन पक्ष्यांच्या सुरक्षेसाठी वन विभागाकडून विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. पक्षी संवर्धनाबाबत जनजागृती मोहीमही सुरू करण्यात आली आहे.- एफ. आर. आझमी, वन परिक्षेत्र अधिकारी, गोंदिया

वन विभागाच्या पथकाची गस्त- सध्या परसवाडा व झिलमिली जलाशय परिसरात सारससह परदेशी पक्ष्यांनी तळ ठोकला आहे. मात्र, या परिसरात पक्षी असुरक्षित दिसत आहेत. पिकांवर कीटकनाशकांचा वापर पक्ष्यांसाठी घातक ठरत आहे. याला गांभीर्याने घेत प्रशासनाने पक्षी संवर्धनासाठी या भागांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू केली आहे. वन विभागाच्या पथकाने गस्त सुरू केल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :forest departmentवनविभाग