शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

सामाजिक वनीकरणच्या परिश्रमातून बहरली वनराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:00 IST

सामाजिक वनीकरण विभागाच्या परिक्षेत्रात तालुक्यातील ग्राम सौंदड, श्रीरामनगर, हेटी, बोपाबोडी, रेंगेपार, खोडशिवणी, डव्वा, खोबा, सावंगी, घोटी, चिंगी, चुडूरका, राका, पळसगाव, चिखली, घटेगाव, गिरोला, चीचटोला या गावात वृक्ष लागवड करून जवळ जवळ सर्वच झाडे जिवंत डौलदार उभे आहेत. लागवड केलेल्या झाडांचे संगोपन करण्यासाठी मार्च महिन्यापर्यंत दररोज १२६ मजुरांना रोजगार दिला जात होता.

राजेश मुनिश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत तालुक्यात दोन लाख ८५ हजार वृक्ष लागवड करून उद्दिष्टपुर्ती करण्यात आली आहे. तालुक्यातील रस्त्याच्या दुतर्फा व गावातील मोकळ्या जागेत झाडे लावून त्यांचे संगोपन करण्यात आले आहे. यामुळे भर उन्हाळ्यातही तालुक्यात लावलेली झाडे हिरवीगार बहरलेली दिसत आहेत.सामाजिक वनीकरण विभागाच्या परिक्षेत्रात तालुक्यातील ग्राम सौंदड, श्रीरामनगर, हेटी, बोपाबोडी, रेंगेपार, खोडशिवणी, डव्वा, खोबा, सावंगी, घोटी, चिंगी, चुडूरका, राका, पळसगाव, चिखली, घटेगाव, गिरोला, चीचटोला या गावात वृक्ष लागवड करून जवळ जवळ सर्वच झाडे जिवंत डौलदार उभे आहेत. लागवड केलेल्या झाडांचे संगोपन करण्यासाठी मार्च महिन्यापर्यंत दररोज १२६ मजुरांना रोजगार दिला जात होता. आता १०० मजूर काम करीत आहेत.लावलेल्या झाडांची उंची ५-६ फूट झाली असून ९० टक्के संगोपन झाल्याचे दिसत आहे. त्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरीक्षेत्राधिकारी अविनाश मेश्राम, वनरक्षक विनोद राऊत, कर्मचारी उत्तम संतोषवार आदिंनी परिश्रम घेतले आहे. तालुक्यातील कोकणा, खोबा, बोपाबोडी, श्रीरामनगर, माहुली, मनिकघाट येथे लागवड केलेली झाडे जिल्हा परिषद बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविली आहेत.संपूर्ण जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्यासाठी लोकांचे सहकार्य लाभल्याने ही योजना यशस्वी ठरली. लागवड केलेली सर्वच झाडे १०० टक्के जिवंत राहतील याचा प्रयत्न आमचे कर्मचारी नेहमी करतात.-अनंत तारसेकरउपविभागीय अधिकारी, सामाजिक वनीकरण गोंदिया...........................................सामाजिक वनीकरण विभागाला मिळालेले उद्दीष्ट लोकांच्या सहकार्यातून पूर्ण केले आहे. रोपांचे संगोपन करून ते टिकविण्यासाठी लोकांचे चांगले सहकार्य मिळाले. सडक-अर्जुनी तालुक्यातील चार कामांना तीन वर्ष पूर्ण झाल्याने ते संबंधित विभागाला सोपविले आहेत.-अविनाश मेश्राम, वन परिक्षेत्र अधिकारीसामाजिक वनीकरण, सडक अर्जुनी

टॅग्स :forest departmentवनविभाग