शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांच्या धानावर चालला वन विभागाचा बुलडोजर

By admin | Updated: May 25, 2014 23:39 IST

गरिबीतून सावरण्यासाठी सावंगी येथील शेतकर्‍यांनी रबी धानाचे उत्पन्न काढले. परंतु वन विभागाच्या हुकुमशाही धोरणाने त्या शेतकर्‍याचे स्वप्न धुळीस मिळविले. हा प्रकार सावंगी येथे घडला.

दोन एकरातील पीक नष्ट : १८ एकरातील अतिक्रमणधारकांना अभय

आमगाव : गरिबीतून सावरण्यासाठी सावंगी येथील शेतकर्‍यांनी रबी धानाचे उत्पन्न काढले. परंतु वन विभागाच्या हुकुमशाही धोरणाने त्या शेतकर्‍याचे स्वप्न धुळीस मिळविले. हा प्रकार सावंगी येथे घडला.

सावंगी येथील तिलकचंद भागचंद लिल्हारे यांनी महसूल विभागाच्या जागेवर १९७0 ला दोन एकरात अतिक्रमण केले. त्यात १९९२-९३ ला दंड म्हणून २00 रुपये व २00७ ला १ हजार रुपये दंड तहसील कार्यालयात भरले.

गावात जवळपास १८ एकरावर लोकांनी अतिक्रमण केले. त्यात शेत जमिन व स्वत:ची पक्के घरे तयार करण्यात आली. इतर शेतकर्‍यांना सोडून तिलकचंद लिल्हारे यांच्या शेतात उभ्या असलेल्या धानावर वनविभागाने बुलडोजर चालविला आहे. आता धान हातात येणार या आशेत असलेल्या शेतकर्‍याच्या पिकावर वनविभागाने जेसीपी व ट्रॅक्टर लावून दोन एकर शेतातील उभे पिक नष्ट केले. ही कारवाई करताना वन विभागाच्या जवळ अतिक्रमण हटविण्याचे कोणतेच आदेश नाही. गोंदिया न्यायालयाने तिलकचंद लिल्हारेचा अर्ज मंजूर केला. सदर प्रकरणाची १९ जून १४ गोंदिया येथे पेशी आहे. मात्र निर्दयी वनविभागाच्या अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी कोणतीही राजरोषपणे पोलिसाचा कर्मचार्‍याचा ताफा घेऊन हाती येणारे धानपिक नष्ट केले. यात सदर शेतकर्‍याचा ६0 ते ७0 हजाराचे नुकसान झाले.

दोन वर्षापूर्वी सावंगी येथे ग्रामपंचायत निवडणूक झाली. त्यात तिलकचंद लिल्हारे, खेलचंद, गेलचंद, फुलचंद या सर्वांंनी गावात ज्याचा दबदबा आहे. त्याला मतदान केले नाही व त्या व्यक्तीचा निवडणूकीत पराभव झाला. ५00 ते ६00 लोकसंख्या असलेल्या गावात संपूर्ण गाव एका बाजूला व लिल्हारे कुटूंब एका बाजूला होते. त्यात वनहक्क समितीचे सचिव व वन सरंक्षण अध्यक्ष याच्या दबावतंत्राने हा प्रकार घडल्याची माहिती आहे. एवढेच नाही तर या लिल्हारे कुटूंबियाचे लहान मुले शेजारच्या गावी शिक्षण घेण्याकरिता जात आहेत. त्यांना विरोधकांमुळे आमच्याशी बोलायचे नाही, असे सांगून त्यांची हेटाळणी करतात. वनविभागाची कारवाई थांबविण्याकरीता १0 ते २0 हजाराची मागणी केल्याचे तक्रारकर्त्यानी सांगीतले. या ठिकाणी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनी माणुसकी दाखविली नाही. पीडित कुटुंबातील लहान मुलाना सालेकसा पोलिसानी बाजीरावचा दणका दिला. पोलिसाकडून त्यांना धमक्या दिल्या गेल्या. विशेष म्हणजे १८ एकर जागेवर अतिक्रमण असताना उर्वरीत लोकावर कारवाई करण्यात आली नाही. धान पिकावर वनविभागाची ही दंडूकशाही पोलिसानी मुक आणि बधीर होऊन पाहीली. या प्रकरणात वनविभागाचे अधिकारी ठवकर यांच्याकडे सुपूर्द केला. (तालुका प्रतिनिधी)