वन विभागाने केला मानकर यांचा सत्कार
By Admin | Updated: February 18, 2015 01:44 IST2015-02-18T01:44:34+5:302015-02-18T01:44:34+5:30
वन आणि पर्यावरण सरंक्षण व समृध्दीच्या दृष्टिकोनातून लोकमत वृत्तपत्रात अनेक बातम्या प्रकाशित करून वनस्पती आणि वन्यजीवांच्या सरंक्षणासाठी जनजागृती केली.

वन विभागाने केला मानकर यांचा सत्कार
सालेकसा : वन आणि पर्यावरण सरंक्षण व समृध्दीच्या दृष्टिकोनातून लोकमत वृत्तपत्रात अनेक बातम्या प्रकाशित करून वनस्पती आणि वन्यजीवांच्या सरंक्षणासाठी जनजागृती केली. त्यासाठी सालेकसाचे लोकमत प्रतिनिधी विजय मानकर यांचा वन विभागाच्या वतीने गोवारीटोला (कावराबांध) येथे सत्कार करण्यात आला.
सालेकसाचे वनरक्षक फुलचंद सी. शेंडे यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यातील वनक्षेत्रात अस्तित्वात असलेले वनस्थली, पक्षी, प्राणी व इतर नैसर्गिक स्थळ आणि बहुमोल ठेवा, याबद्दल माहिती संकलित करून पर्यावरण ज्ञान मंजुषा पुस्तक तयार करण्यात आली. ही पुस्तक विजय मानकर भेट देण्यात आली. सालेकसाचे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेट वस्तू देवून गौरव करण्यात आला. यावेळी राजेंद्र बडोले, बद्रीप्रसाद दसरिया, विनोद जैन, वनरक्षक एफ.सी. शेंडे, डॉ. अशोक वैद्य आदी उपस्थित होते. (वार्ताहर)