वन्यप्राण्यांसाठी बांधला वनराई बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:49 IST2018-10-07T00:48:15+5:302018-10-07T00:49:58+5:30
नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात वन्यप्राण्यांसाठी श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. वन परिक्षेत्र बोंडे अंतर्गत येणाºया सहवनक्षेत्र पिंडकेपार मधील ग्राम परिस्थिती विकास समिती कोटजांभोराच्यावतीने वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून वन्यप्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी......

वन्यप्राण्यांसाठी बांधला वनराई बंधारा
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात वन्यप्राण्यांसाठी श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. वन परिक्षेत्र बोंडे अंतर्गत येणाºया सहवनक्षेत्र पिंडकेपार मधील ग्राम परिस्थिती विकास समिती कोटजांभोराच्यावतीने वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून वन्यप्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पिंडकेपार भाग-१ कक्ष क्रमांक ६६६ मधील चिकणझरी नाल्यावर ११० सिमेंट बॅगचे वनराई बंधारा श्रमदानातून बांधण्यात आला.
गावातील लोकांना वनांविषयी आपुलकी निर्माण व्हावी, वन व वन्यजीवांचे महत्व कळावे या उद्देशाने ग्रामस्थांची वनभ्रमंती करण्यात आली. नवेगावबांधचे सहायक वनरक्षक प्रदीप पाटील, वन्यजीव व अभयारण्य बोंडेचे वनपरिक्षेत्राधिकारी महेश चोपडे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक प्यारेलाल उसेंडी यांनी ग्राम कोडजमूरा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वन्यजीव सप्ताहा निमित्त वन व वनजीवांची माहिती दिली. शाळेत चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करुन मुलांना प्राण्यांविषयी अधिकाधिक माहिती देण्यात आली. विविध झाडे, औषधी वनस्पती तसेच प्राण्यांच्या आवाजाची माहिती देण्यात आली.
वृक्ष तोड व प्राण्यांविषयी जिव्हाळाचे महत्व पटवून दिले. यावेळी ग्राम परिस्थितीकी विकास समितीचे अध्यक्ष लखनलाल दूधकवर, तेजराम मडावी, मन्साराम नेताम, रुपेश राऊत, गेंदलाल गायगवाल, मानिक तराम, धनराज हिडामी, सुमनर करसायल, अशोक राऊत, अनिल बागतलवार, वनिता मेश्राम, कौशल्या मडावी, हिमेश्वरी सोनार, जाना वालदे, फुल मुंदी, आश हिडामी आदी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांना माहिती देण्यासाठी वनरक्षक शिला दालपिठे, ममता राऊत यांनी सहकार्य केले. संचालन करून आभार वनरक्षक अमित शहारे यांनी मानले.