रेशीम लॉज व हॉटेलमधून विदेशी दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:27 IST2021-05-22T04:27:44+5:302021-05-22T04:27:44+5:30

देवरी: अवैध दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी आदेश दिले असून त्यानुसार देवरी पोलिसांनी गुरूवारी (दि.२०) येथील ज्योतिबा ...

Foreign liquor seized from Silk Lodge and Hotel | रेशीम लॉज व हॉटेलमधून विदेशी दारू जप्त

रेशीम लॉज व हॉटेलमधून विदेशी दारू जप्त

देवरी: अवैध दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी आदेश दिले असून त्यानुसार देवरी पोलिसांनी गुरूवारी (दि.२०) येथील ज्योतिबा धनिराम धरमशहारे (४७,रा.देवरी) यांच्या रेशीम लॉज व हॉटेलवर धाड घातली. यामध्ये पोलिसांनी तेथून १४१५ रूपयांची विदेशी दारू जप्त केली आहे.

पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या आदेशान्वये तसेच अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात गुरुवारी (दि.२०) ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे येथील रेशीम लॉज व हॉटेलमध्ये धाड घातली. यात त्यांना तेथे वेगवेगळ्या विदेशी दारू कंपनीच्या १४१५ रूपये किमतीच्या १५ बॉटल्स मिळून आल्या. प्रकरणी ज्योतिबा धरमशहारे यांच्यावर कलम ६५ (इ), ७७(अ) मदाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार सिंगनजुडे, पोलीस शिपाई गुनेश्वर नेवारे व हिरासिंग कनपुरिया यांनी केली आहे.

Web Title: Foreign liquor seized from Silk Lodge and Hotel