चिमुकलीवर बळजबरीचा प्रयत्न; सात वर्षाचा कारावास
By Admin | Updated: November 17, 2016 00:18 IST2016-11-17T00:18:34+5:302016-11-17T00:18:34+5:30
तिरोडाच्या नेहरू वॉर्डात ८ मार्च २०१४ रोजी सकाळी ८.३१ वाजता दरम्यान घराशेजारच्या विनोद मिताराम नेवारे (२८)

चिमुकलीवर बळजबरीचा प्रयत्न; सात वर्षाचा कारावास
तिरोडाच्या नेहरू वॉर्डातील घटना: अॅट्रासिटीत मात्र निर्दोष
गोंदिया : तिरोडाच्या नेहरू वॉर्डात ८ मार्च २०१४ रोजी सकाळी ८.३१ वाजता दरम्यान घराशेजारच्या विनोद मिताराम नेवारे (२८) याने ३ वर्षाच्या चिमुकलीला आपल्या घरी नेऊन तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेतील आरोपीला न्यायालयाने सात वर्षाचा सश्रम कारावास सुनावला आहे.
घराशेजारील एका ३ वर्षाच्या मुलीला आरोपीने नड्या व चाकलेट घेऊन देतो म्हणून तिला आपल्या सोबत नेले. त्यावेळी त्या पिडीत मुलीची आई गृहकाम करीत होती. मुलीकडे तिचा दुर्लक्ष झाल्याने आरोपीने याचा फायदा घेतला. बराच वेळ झाल्यावर माझी मुलगी दिसत नाही म्हणून तिने मुलीला पाहण्यासाठी विचाारपूस सुरू केल्या पिडीत मुलीच्या काकाने तीला विनोद घेऊन गेला असे सांगितले. त्यानंतर विनोदच्या घरी जाऊन पाहिले असता विनोदने आतून दार लावून तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न करीत होता. सगळ्यांनी त्याना रंगेहात पकडल्यावर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तिरोडा पोलिसांनी आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ३६३,३६६ (अ),३४२, ३७६ (२) (आय) सहकलम अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम ३ (१) (११) (१२) अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात न्यायालयाने ११ साक्षदार तपासले. जिल्हा सत्र न्यायाधीश १ यांनी या प्रकरणावर मंगळवारी शिक्षा सुनावली. कलम ३४२ अन्वये १ वर्षाची शिक्षा ५०० रूपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसाची शिक्षा. ३६३ अन्वये ७ वर्षाची शिक्षा १००० रूपये दंड व दंड न भरल्यास १ महिन्याची शिक्षा. ३७६ (२) (आय), ५११ अन्वये ७ वर्षाची शिक्षा १००० रूपये दंड व दंड न भरल्यास १ महिन्याची शिक्षा. बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कलम ७,८ अन्वये ३ वर्षाची शिक्षा १००० रूपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसाची शिक्षा सुनावली आहे.