मुख्यालयी राहण्याची सक्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:30 IST2021-05-27T04:30:51+5:302021-05-27T04:30:51+5:30
तालुक्यातील ग्रामीण भागात कार्यरत तलाठी व ग्रामसेवक तालुका मुख्यालयात राहून एरवी अप-डाऊन करतात. परंतु सध्या प्रशासनाने गठीत केलेल्या कोरोनाच्या ...

मुख्यालयी राहण्याची सक्ती करा
तालुक्यातील ग्रामीण भागात कार्यरत तलाठी व ग्रामसेवक तालुका मुख्यालयात राहून एरवी अप-डाऊन करतात. परंतु सध्या प्रशासनाने गठीत केलेल्या कोरोनाच्या गाव समितीत या कर्मचाऱ्यांचा समावेश असतानाही ते मुख्यालयाला दांडी मारत आहेत. विशेष म्हणजे, खरीप हंगामाला काही दिवसातच सुरूवात होणार आहे. सध्या पीक कर्ज काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांना सातबारा व अन्य कागदपत्रे द्यावी लागतात. अशा स्थितीत कार्यालयात हजर राहणे आवश्यक आहे. परंतु हे कर्मचारी मुख्यालयात उपस्थित राहत नाही. शासनाने कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे शक्तीचे केले आहे. परंतु या नियमाचे पालन होताना दिसून येत नाही. दोन्ही विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी व सर्वसामान्यांची कोंडी होत आहे. आवश्यक कागदपत्रासाठी पायपीट करीत असल्याने चांगलीच दमछाक होत आहे. करीता गावस्थळावर राहणे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.