जिल्ह्यात फूट वेअर डिझाईन केंद्र

By Admin | Updated: June 20, 2016 01:35 IST2016-06-20T01:35:34+5:302016-06-20T01:35:34+5:30

जिल्ह्यात फूट वेअर डिझाईन केंद्र स्थापित करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला आहे. या संदर्भात एक प्रस्ताव केंद्र शासनाला मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

Footwear Design Center in the district | जिल्ह्यात फूट वेअर डिझाईन केंद्र

जिल्ह्यात फूट वेअर डिझाईन केंद्र

केंद्र शासनास प्रस्ताव पाठविला : राजकुमार बडोले यांचे कथन
गोंदिया : जिल्ह्यात फूट वेअर डिझाईन केंद्र स्थापित करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला आहे. या संदर्भात एक प्रस्ताव केंद्र शासनाला मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. सदर प्रस्ताव मंजूर करवून घेण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. ही माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी एका पत्रपरिषदेत दिली.
या दरम्यान बडोले यांनी अनेक विषयांवर पत्रकारांशी उघडपणे चर्चा केली. विशेषत: आपल्या सामाजिक न्याय विभागाबद्दल त्यांनी विविध माहिती उपलब्ध करून दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यात धम्मकुटी, कोरणीघाट व कालीमाटी येथे पर्यटन स्थळांचा विकास जिल्हा नियोजनाच्या माध्यमाने करण्यात येईल.
त्यांनी सांगितले की, अनुसूचित जाती-जमातीचे प्रमाणपत्र बनविण्यासाठी सन १९५० च्या पूर्वीचे दाखले आणण्याची अट शासनाकडून लावण्यात आली आहे. त्यात व्यापक दुरूस्ती करण्यात येण्याची माहिती त्यांनी दिली. येत्या १६ आॅगस्ट रोजी अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी एक महाराजस्व अभियान आयोजित करण्यात येत आहे. या अभियानात शेतकरी-विद्यार्थी व गरजूंना जवळपास २५ हजार प्रमाणपत्र बनवून देण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Footwear Design Center in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.