बुद्ध व बाबासाहेबांचा मार्ग अवलंबवा

By Admin | Updated: May 28, 2016 01:56 IST2016-05-28T01:56:36+5:302016-05-28T01:56:36+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीद्वारे स्थानिक संजयनगर मैदानात रात्री जीत आर्केष्ट्राद्वारे सुगम बुद्ध-भीग गीतांचा कार्यक्रम ...

Follow the path of Buddha and Babasaheb | बुद्ध व बाबासाहेबांचा मार्ग अवलंबवा

बुद्ध व बाबासाहेबांचा मार्ग अवलंबवा

गोंदिया : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीद्वारे स्थानिक संजयनगर मैदानात रात्री जीत आर्केष्ट्राद्वारे सुगम बुद्ध-भीग गीतांचा कार्यक्रम व जागृती संघटनेद्वारे नृत्य सादर करण्यात आले. तथागत गौतम बुद्ध व बाबासाहेबांच्या छायाचित्रावर माल्यार्पण करून दीप प्रज्ज्वलित करण्यात आले. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष अनिल सुखदेवे होते. अतिथी व मार्गदर्शक म्हणून डॉ. रमेश भांडारकर, घनश्याम नंदनवार, नरेंद्र भोंडे, अशोक आगलावे, डॉ. प्रशांत मेश्राम, अ‍ॅड. प्रज्ञा डोंगरे, ए.आर. वरूण, डॉ. घनश्याम तुरकर, किशोर धुमाल, रतन वासनिक, ममता नंदागवळी उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात डॉ. शंभरकर यांनी, तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांना अंगिकृत करून त्यांच्या मार्गाचा अवलंब करावा, असे सांगितले. तसेच बाबासाहेबांच्या संविधान निर्मितीच्या कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमासाठी महेंद्र कठाणे, सुनील आवडे, पौर्णिमा नागदेवे, अतुल सतदेवे, धीरजकुमार मेश्राम, यशपाल डोंगरे, वसंत गणवीर, दिपेंद्र वासनिक, योगेश बन्सोड, शैलेश वासनिक, मुकेश ठवरे, रंजित मेश्राम, देवा रूसे, अरविंद नागदेवे, मामा मते आदी समितीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: Follow the path of Buddha and Babasaheb