जमीन तापल्याने तर्कवितर्कांना उधाण

By Admin | Updated: July 28, 2014 23:36 IST2014-07-28T23:36:11+5:302014-07-28T23:36:11+5:30

बाजारात असलेल्या एका दुकानातील जागा तापत असल्याच्या घटनेने सोमवारी शहरात एकच खळबळ माजली होती. याबाबत माहिती मिळताच शहरवासीयांनी उत्सुकतेने घटनास्थळी एकच गर्दी केली होती.

Flat irrigation due to heat from the ground | जमीन तापल्याने तर्कवितर्कांना उधाण

जमीन तापल्याने तर्कवितर्कांना उधाण

दुकानातील प्रकार : भूजल सर्व्हेक्षणकर्त्यांकडून दखल
गोंदिया : बाजारात असलेल्या एका दुकानातील जागा तापत असल्याच्या घटनेने सोमवारी शहरात एकच खळबळ माजली होती. याबाबत माहिती मिळताच शहरवासीयांनी उत्सुकतेने घटनास्थळी एकच गर्दी केली होती. मात्र हा प्रकार नेमका कोणत्या कारणातून घडत होता याबाबत स्पष्ट कारण पुढे आले नाही.
शहरातील रेल्वे स्टेशन मार्गावर असलेल्या ग्रीड एन गिफ्ट या दुकानाचे मालक प्रदीप नशिने हे नेहमीप्रमाणे सोमवारी आपल्या दुकानाचे शटर उघडत असताना त्यांना कुलूप गरम वाटले. यावर त्यांनी उत्सुकतेने तेवढ्या जागेवर पाय ठेऊन बघितला असता त्यांना पायाला गरमपणा जाणवू लागला. तरीही त्यांनी त्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. काही वेळाने मोलकरीनने पाण्याचे पोतेरे लावले असता त्या जागेवरून हलक्या वाफा येत होत्या. त्यामुळे नशिने यांनी वाटीत पाणी घेऊन त्या ठिकाणी ठेवले असता वाटीतले पाणीही गरम झाले.
या प्रकार काहीतरी वेगळा असावा म्हणून नशिने यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर व नगर परिषद मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्यासह अग्निशमन विभागाला दिली. काही वेळातच अग्निशमन विभागाची गाडीही तिथे पोहोचली. दरम्यान या प्रकाराची वार्ता शहरात झपाट्याने पसरली. काहींनी तिथे गरम पाण्याचा झरा असल्याचा तर्क लावला. उत्सुकतेपोटी नागरिकांनी घटनास्थळी हा प्रकार बघण्यासाठी एकच गर्दी केली होती. एवढेच नाही तर जागा खरच तापत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी हात व पाय ठेऊन चाचपणीही केली जात होती.
दरम्यान भूजल सर्व्हेक्षण विभागाला याबाबतची माहिती देण्यात आली. त्यांनी याबाबत अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Flat irrigation due to heat from the ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.