बलात्काऱ्याला पाच वर्षाची शिक्षा

By Admin | Updated: April 13, 2016 01:56 IST2016-04-13T01:56:15+5:302016-04-13T01:56:15+5:30

गोंदिय ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तुमखेडा खुर्द येथील सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी तरूणाला

Five-year sentence for rapist | बलात्काऱ्याला पाच वर्षाची शिक्षा

बलात्काऱ्याला पाच वर्षाची शिक्षा

गोंदिया : गोंदिय ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तुमखेडा खुर्द येथील सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी तरूणाला न्यायालयाने पाच वर्षाचा सश्रम कारावास व १० हजार रूपये दंड ठोाठावला आहे.
शिव कृपाल मचाडे (२५) असे आरोपीचे नाव आहे. त्याने १२ एप्रिल २०११ रोजी त्याने गावातीलच एका सात वर्षाच्या मुलीवर बळजबरी केली. गावात मचाडे कुटुंबीयांकडे लग्न समारंभ होते. त्या लग्न समारंभातून घरी परतणाऱ्या सात वर्षाच्या मुलीला जनावरांच्या गोठ्यात नेऊन शिव ने तिच्यावर बळजबरी केली होती. रात्री ११ वाजताच्या सुमारास त्या मुलीवर त्याने बळजबरी केली. या प्रकरणात गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांत भादंविच्या कलम ३७६ (फ) ३४२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणावर जिल्हा सत्र न्यायालयात आज दि. १२ रोजी सुनावणी करण्यात आली. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश एम.जी. गिरटकर यांनी या प्रकरणावर सुनावणी केली. सरकारी म्हणून अ‍ॅण्ड. शबाना अंसारी यांनी काम पाहिले. या प्रकरणातील आरोपीला ५ वर्षाचा सश्रम कारावास व १० हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक महिन्याचा कारावास सुनावण्यात आला. दंडाच्या रकमेतील पाच हजार रूपये मदत म्हणून पीडितेला देण्यात यावे असेही न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात सीएमएस सेलचे प्रभारी महेश महाले यांच्या नेतृत्वात सहायक फौजदार राजकुमार कराडे व सीएमएस सेलच्या इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Five-year sentence for rapist