अल्पवयीन तरुणीवर बलात्कार करणाऱ्याला पाच वर्षाची शिक्षा
By Admin | Updated: October 29, 2015 00:19 IST2015-10-29T00:19:37+5:302015-10-29T00:19:37+5:30
गोरेगाव तालुक्याच्या म्हसगाव येथील १६ वर्षाच्या मुलीवर बळजबरी करणाऱ्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

अल्पवयीन तरुणीवर बलात्कार करणाऱ्याला पाच वर्षाची शिक्षा
गोंदिया : गोरेगाव तालुक्याच्या म्हसगाव येथील १६ वर्षाच्या मुलीवर बळजबरी करणाऱ्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे. मनिराम सेवकराम बोपचे (२९) रा. म्हसगाव, ता. गोरेगाव असे आरोपीचे नाव आहे.
त्याने गावातील १६ वर्षाच्या मुलीला एकटी पाहून तिच्यावर ११ नोव्हेंबर २००९ च्या दुपारी ३ वाजता बळजबरी केली. तिची आई शेतावर शेळ्या घेऊन गेली होती. हे प्रकरण महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीकडे गेले. परंतु हे प्रकरण हाताळण्याचा अधिकार तंटामुक्त समितीला नसल्यामुळे त्यांनी ते प्रकरण पोलिसांकडे पाठविले. आदिवासी समाजातील ती मुलगी आहे. परंतु तिच्याकडे जातीचे प्रमाणपत्र नसल्यामुळे अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला नव्हता.
या प्रकरणाचा तपास गोंदियाचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष कुंभारे यांनी केला. या प्रकरणावर बुधवारी सुनावणी करण्यात आली. जिल्हा न्यायाधीश १ एस.आर. त्रिवेदी यांनी शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अॅड.शबाना अंसारी यांनी काम पाहिले. कलम ३७६ अन्वये पाच वर्षाची शिक्षा व एक हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा, कलम ५११ अन्वये एक वर्षाची शिक्षा एक हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा, कलम ४४८ अंतर्गत एक वर्षाची शिक्षा, कलम ४५१ अंतर्गत दोन वर्षाची शिक्षा व १ हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा सुनावली आहे. पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, उपनिरीक्षक सचिन धुमाळ, महिला हवालदार सुधा गणवीर, सीएमएससेलचे महेश महाले, एस.सी. फुलसुंगे यांनी सहकार्य केले.