पाच ट्रॅक्टर, एक जेसीबी जप्त

By Admin | Updated: May 17, 2017 00:11 IST2017-05-17T00:11:33+5:302017-05-17T00:11:33+5:30

शहराला लागून असलेल्या पांगोली नदीच्या पात्रातील रेती जेसीबीने उपसा करुन ट्रॅक्टरच्या माध्यमातून वाहतूक केली जात होती.

Five tractors, one JCB seized | पाच ट्रॅक्टर, एक जेसीबी जप्त

पाच ट्रॅक्टर, एक जेसीबी जप्त

तुमखेडा रस्त्यावर कारवाई : पांगोलीतील रेतीचा केला जात होता उपसा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहराला लागून असलेल्या पांगोली नदीच्या पात्रातील रेती जेसीबीने उपसा करुन ट्रॅक्टरच्या माध्यमातून वाहतूक केली जात होती. या संदर्भात गोंदियाचे तहसीलदार व त्यांच्या चमूने सोमवारच्या रात्री ११.५० वाजता कारवाई करुन रेती वाहून नेणारे पाच ट्रॅक्टर व एक जेसीबी जप्त करण्यात आली.
पांगोली नदीतील रेती जेसीबी क्रमांक एसएचएआर ३ एसएससी ०२५१८३९२ या जेसीबीने रेती काढत असताना लोकेश बारकू टेकाम याला पकडण्यात आले. सोबतच मोहगाव येथील संजय हेतराम पटले यांच्या मालकीचा ट्रॅक्टर एमएच ३५ जी-८५८८ व विना क्रमांक असलेली ट्रॉली असलेला ट्रॅक्टर, फुलचूर येथील पप्पू पटले यांच्या मालकीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर, विश्वनाथ लक्ष्मण भांडारकर यांच्या मालकीचा एमएच ३५-८२८१ ट्रॉली एमएच ३५-एफ ३७७०, मोहगाव येथील जितेंद्र डागलाल पटले यांच्या मालकीचा एमएच ३५-जी ७६९६ विना क्रमांकाची ट्रॉली व खमारी येथील राजेंद्र भांडारकर यांच्या मालकीचा एमएच ३५-जी ६९०१ ट्रॉली एमएच ३५-एफ ४५५६ या वाहनांना रेती वाहून नेताना रंगेहात पकडण्यात आले.
त्यांच्या जवळून दिड लाख रुपये किमतीची रेती जप्त करण्यात आली. या संदर्भात गोंदिया ग्रामीण पोलिसात भादंविच्या कलम ३७९ व ५११ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई तहसीलदार अरविंद हिंगे, नायब तहसीलदार विजय पवार, तलाठी आर.एस. बोडके यांनी केली आहे.

Web Title: Five tractors, one JCB seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.