दुष्काळग्रस्त पाच हजार शेतकरी मदतीला मुकले

By Admin | Updated: March 13, 2017 00:21 IST2017-03-13T00:21:28+5:302017-03-13T00:21:28+5:30

सन २०१५ च्या खरीप हंगामात गोंदिया जिल्ह्यातील १०९ गावे महाराष्ट्र शासनाने दुष्काळग्रस्त घोषीत केली.

Five thousand farmers of the drought hit their hands | दुष्काळग्रस्त पाच हजार शेतकरी मदतीला मुकले

दुष्काळग्रस्त पाच हजार शेतकरी मदतीला मुकले

८४ गावांतील शेतकऱ्यांचे हाल : कापणी प्रयोग उंबरठ्याने केला घात
नरेश रहिले   गोंदिया
सन २०१५ च्या खरीप हंगामात गोंदिया जिल्ह्यातील १०९ गावे महाराष्ट्र शासनाने दुष्काळग्रस्त घोषीत केली. परंतु या १०९ पैकी आमगाव विधानसभा क्षेत्रातील ८४ गावातील ५ हजार ३५७ शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. मागील एक वर्षापूर्वी आ. संजय पुराम यांनी शासन दरबारी शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी केली. परंतु आतापर्यंत या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. उंबरठा उत्पन्नापेक्षा चालू वर्षाचे सरासरी उत्पन्न जास्त असल्याचे दाखविल्याने या शेतकऱ्यांना मदतीपासून वंचीत ठेवण्यात आले आहे.
मागील दिड वर्षापासून या दृष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत न दिल्याने आ. संजय पुराम यांनी ६ मार्च २०१६ रोजी महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे निवेदन देऊन त्या ८४ गावातील शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली. परंतु एक वर्ष लोटूनही त्यांच्या सरकारने त्यांच्या मागणीला मान्य केले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाने यासंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया यांच्याकडून अहवाल मागविला. त्या अहवालानुसार जिल्ह्यात खरीप हंगाम २०१५ अंतर्गत जिल्ह्यातील ४ तालुक्यातील १०९ गावे २३ मार्च २०१६ ला दुष्काळसदृश गावे म्हणून जाहीर करण्यात आली. आमगाव विधानसभा क्षेत्रात सन २०१५-१६ मध्ये तालुका देवरी, आमगाव व सालेकसा येथील राष्ट्रीय कृषी पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही.
आमगाव विधानसभा क्षेत्रामध्ये ५६३० शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेमध्ये सहभाग घेतला होता. यापैकी फक्त सालेकसा तालुक्यातील २७३ शेतकऱ्यांनाच राष्ट्रीय कृषी विमा कंपनी कडून ११६४०९.१५ रूपये नुकसान भरपाई देण्यात आली. सालेकसा तालुक्यात कावराबांध, सालेकसा व साखरीटोला या तीन राजस्व मंडळापैकी फक्त कावराबांध या राजस्व मडळातील पिक कापणी प्रयोगाचे उत्पन्न उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी आल्यामुळे केवळ त्याच राजस्व मंडळातील पिक विमा हप्ता भरलेलल्या शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात आली आहे.


उंबरठा उत्पन्नापेक्षा
सरासरी उत्पन्न अधिक
राष्ट्रीय कृषी पिक विमा योजना ही पिक कापणी प्रयोगावर आधारीत आहे. कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त झालेल्या नियोजनानुसार महसूल, कृषी, जि.प. मधील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना पिक कापणी प्रयोगाचे नियोजन देण्यात येते. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून पिक कापणी प्रयोगाचे तक्ता क्रं.२ प्राप्त झाल्यानंतर राजस्व मंडळ, तालुकानिहाय आलेले भात पिकाचे उत्पादकतेचे संकलन करून कृषी आयुक्तालयास सादर करण्यात येते. कृषी आयुक्तालय हे त्या वर्षात आलेली सरासरी प्रति हेक्टरी उत्पादकता विमा कंपनीस सादर करते. शासन निर्णयानुसार भात पिकाचे जोखीमस्तर (उंबरठा उत्पन्न) ६० टक्के आहे. अधिसूचित राजस्व मंडळामधील मागील ५ वर्षाचे प्रती हेक्टरी सरासरी उत्पन्न ६० टक्के म्हणजेच ते त्या राजस्व मंडळाचे उंबरठा उत्पन्न होय. उंबरठा उत्पन्नापेक्षा चालू वर्षाचे सरासरी उत्पन्न कमी आले तरच नुकसान भरपाई देण्यात येते. उंबरठा उत्पन्नापेक्षा चालू वर्षाचे सरासरी उत्पन्न जास्त आल्याने आमगाव विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई दिली नाही.
११३७९ शेतकऱ्यांनी काढला होता पिक विमा
४गोंदिया जिल्ह्यात सन २०१५ च्या खरीप हंगामात राष्ट्रीय कृषी विमा कंपनी कडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार खरीप हंगामामध्ये भात पिकाचा विमा ११ हजार ३७९ शेतकऱ्यांनी काढला होता. या शेतकऱ्यांनी १६६३८.०२ हेक्टर शेतीचा विमा केला होता. ८ तालुक्यापैकी गोंदिया, गोरेगाव व सालेकसा या तीन तालुक्यातील १०८४ शेतकऱ्यांना १६२६२२८.४१ रूपये नुकसान भरपाई राष्ट्रीय कृषी विमा कंपनी कडून देण्यात आले.

Web Title: Five thousand farmers of the drought hit their hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.