ेगुंडगर्दी करणाऱ्या पाच जणांना अटक

By Admin | Updated: September 11, 2016 00:24 IST2016-09-11T00:24:22+5:302016-09-11T00:24:22+5:30

पिस्टल, तलवार व लोखंडी राड घेऊन गावकऱ्यांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गोंदियातील पाच जणांना रावणवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

Five people arrested in Gundargad | ेगुंडगर्दी करणाऱ्या पाच जणांना अटक

ेगुंडगर्दी करणाऱ्या पाच जणांना अटक

नागरिकांवर प्राणघातक हल्ला: पिस्टल, तलवार व राड जप्त
गोंदिया : पिस्टल, तलवार व लोखंडी राड घेऊन गावकऱ्यांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गोंदियातील पाच जणांना रावणवाडी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारच्या रात्री ११ वाजता दरम्यान मरारटोला (तेढवा) येथे करण्यात आली.
गोंदिया तालुक्याच्या मरारटोला तेढवा येथे सार्वजनिक गणेशोत्सवात कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. त्या स्पर्धेनंतर १० वाजताच्या सुमारास एक खाली ट्रॅक्टर भरधाव वेगात गावातून धावत होता. यावेळी रस्त्यावर बालके असल्याने अपघात होऊ नये यासाठी नागरिकांनी त्या ट्रॅक्टरच्या दिशेने धाव घेतली. मात्र ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर सोडून पसार झाला. त्यानंतर त्याने फोन करून आपल्या साथीदारांना बोलावल्यामुळे गोंदियातील पाच जण एक पीस्टल, दोन तलवार व लोखंडी राड घेऊन रात्री १०.३० वाजता दाखल झाले. यावेळी त्यांनी गावकऱ्यांवर हल्ला चढविला.
एकत्र गावकरी आल्याने आरोपींनी पिस्टलचा धाक दाखवित ठार करण्याची धमकी दिली. आरोपी गणीखान जब्बार खान (२९) रा. न्यू लक्ष्मीनगर गोंदिया, इमरान महफूज खान (२८) रा. टी.बी.टोली गोंदिया, बंदे शब्बीर खान (२४) रा. रेलटोली गोंदिया,राहूल सुनिल नेवारे (२४) रा. न्यू लक्ष्मीनगर गोंदिया व दुर्गेश लक्ष्मण विठोले (१९) रा. अंगुरबगीचा गोंदिया यांनी गावात दहशत पसरविल्याने रात्रभर गावात दहशतीचे वातावरण होते.
या प्रकरणातील स्कार्पीओ क्र.एमएच ३५ पी ४८०३, ट्रॅक्टर एमएच ३५ एफ ४८२९ ट्राली क्र.एमएच ३५ जी ८१३८ व मोटारसायकल एमएच ३५ एल ७८२३ हे तीन वाहन, एक पीस्टल, दोन तलवार व लोखंडी राड जप्त करण्यात आल्या. सदर आरोपींविरूध्द भादंविच्या कलम ३०७, १४७, १४९, सहकलम ३, ४, २५ भारतीय हत्यार कायदा, सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींना १२ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ट्रॅक्टर चालविणारा तो कोण याची माहिती घेणे सुरू आहे. तपास ठाणेदार संजीव गावडे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Five people arrested in Gundargad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.