हजार मुलांमागे वाढल्या पाच मुली !

By Admin | Updated: April 24, 2016 01:59 IST2016-04-24T01:59:54+5:302016-04-24T01:59:54+5:30

मुलगा वंशाचा दिवा समजणाऱ्या लोेकांना कायद्याचा वचक बसला कि जनजागृतीमुळे झालेला परिवर्तन आहे हे सांगणे निश्चीत नसले तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत...

Five girls increased in thousands of boys! | हजार मुलांमागे वाढल्या पाच मुली !

हजार मुलांमागे वाढल्या पाच मुली !

फुलू लागले मुलींचे जीवन : देवरी व सालेकसा तालुक्यात मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक
नरेश रहिले गोंदिया
मुलगा वंशाचा दिवा समजणाऱ्या लोेकांना कायद्याचा वचक बसला कि जनजागृतीमुळे झालेला परिवर्तन आहे हे सांगणे निश्चीत नसले तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत ंयावर्षी मुलींच्या जन्मात वाढ झाली आहे. सन २०१४-१५ या वर्षात एक हजार पुरूषामागे ९५२ मुली जन्माला आल्या होत्या. परंतु यावर्षी सन २०१५-१६ या वर्षात एक हजार पुरूषामागे ९५७ मुली जन्माला आल्याची जिल्ह्याची आकडेवारी दर्शविते. या चांगल्या बातमीने सामाजिक समतोल राखण्यास मोलाची मदत होणार आहे.
सन २००१ या वर्षी जिल्ह्याचे पुरूषाच्या तुलनेत मुलीचे जन्मदर १००५ होता. त्यानंतर २००९-१० मध्ये ९२९ झाला. सन २०१०-११ मध्ये ९५४, २०११-१२ पुन्हा ९२९ झाला. परंतु सन २०१२-१३ या वर्षात सदर ९७२ वर गेला. परंतु त्यानंतर सतत मुलींचे जन्मदर घटत राहीले. सन २०१३-१४ मध्ये ९४४, २०१४-१५ मध्ये ९५२ होता. परंतु या वर्षी मुलींच्या आकड्यात वाढ झाली आहे. दर हजारी पुरूषांमागे ९५७ मुली जन्माला आल्या आहेत.
गोंदिया जिल्ह्यात देवरी व सालेकसा तालुक्यात मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे. देवरी तालुक्यात १०३४ तर सालेकसा तालुक्यात १०८९ मुलींनी जन्म घेतला आहे. परंतु सडक-अर्जुनी, आमगाव, गोरेगाव, अर्जुनी-मोरगाव व तिरोड़ा तालुक्यात भयावह स्थिती आहे.
डीएचआयएस-२ च्या दिलेल्या आकडेवारीनुसार सन २०१५-१६ जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर हजारी पुरूषांमागे ९५७ आहे. यावर्षी जिल्ह्यात १८ हजार ९३६ बालके जन्माला आले.यात आमगाव १०८१, अर्जुनी-मोरगाव १३४०, देवरी १५६८, गोंदिया १०७६२, सडक-अर्जुनी १०१७, सालेकसा ८७३, तिरोडा १३१९, गोरेगाव ९७६ बालक जन्माला आले.

कन्याजन्मानंदात सालेकसा, देवरी
जिल्ह्यात सालेकसा व देवरी ह्या दोन तालुक्यात मुलींच्या जन्मदराची स्थिति चांगली आहे देवरी तालुक्यात दर हजारी पुरूषांमागे १०३४ तर सालेकसा तालुक्यात हजारी पुरूषांमागे १०८९ मुलींनी जन्म घेतला आहे. गोंदिया तालुका जिल्ह्याच्या आकडेवारीपेक्षा अधिक म्हणजेच ९७१ संख्या आहे.

सडक-अर्जुनीत स्त्री भू्रणहत्या?
जिल्ह्यात देवरी, सालेकसा व गोंदिया तालुक्याला वगळता पाच तालुक्यात मुलींचा जन्मदर कमी आहे. परंतु सार्वात वाईट परिस्थिती सडक-अर्जुनी तालुक्याची आहे. हजारी पुरूषामागे १६४ मुलीं कमी जन्माला आल्या आहेत. फक्त ८३६ मुली हजारी पुरूषामागे जन्माला आल्या आहेत. आमगाव ८८३, गोरेगाव ८९५, अर्जुनी-मोरगाव ८९८ व तिरोडा तालुक्यात ९४८ मुलींनी जन्म घेतला आहे.

३६३ उपजत मृत्यू
जिल्ह्यात सन २०१५-१६ या वर्षात १८ हजार ९३६ बालकांनी जन्म घेतला. यातील १.९१ टक्के म्हणजेच ३६३ बालकांचा मृत्यू झाला आहे. गोंदिया आदिवासी व नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल असल्याने जिल्ह्यातील महिलांमध्ये आरोग्या संबधी पाहिजे तेवढी जनजागृती झाली नाही. महिलांच्या असंतुलीत आराहारमुळे बाळ पोटातचत कुपोषित होते. परिणामी जन्म घेतल्यानंतर दगावत असतात. आमगाव तालुक्यात १४, अर्जुनी-मोरगाव १६, गोंदिया २२८, सडक-अर्जुनी ११, सालेकसा १८, तिरोडा २६ व गोरेगाव २४ बालकांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Five girls increased in thousands of boys!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.