व्हेंटिलेटर असलेल्या पाच रुग्णवाहिका कोविडच्या सेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:28 IST2021-04-24T04:28:54+5:302021-04-24T04:28:54+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मृत्यूचे तांडव सुरू आहे. जिकडे-तिकडे ऑक्सिजनची कमतरता म्हणून आरडाओरड सुरू आहे. ...

व्हेंटिलेटर असलेल्या पाच रुग्णवाहिका कोविडच्या सेवेत
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मृत्यूचे तांडव सुरू आहे. जिकडे-तिकडे ऑक्सिजनची कमतरता म्हणून आरडाओरड सुरू आहे. कोविड रुग्णांना ऑक्सिजनअभावी प्राणास मुकावे लागत असल्याने त्यांना रुग्णवाहिकेत ऑक्सिजन मिळावे म्हणून पाच व्हेंटिलेटरयुक्त रुग्णवाहिका गोंदिया जिल्ह्यात आल्या आहेत.
१२ एप्रिल रोजी आलेल्या या रुग्णवाहिका गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्रांगणात मागील भागात उभ्या होत्या. परंतु या रुग्णवाहिका लोकांच्या सेवेत कामी याव्यात म्हणून गोंदियातील यादव बांधवांनी पुढाकार घेऊन मुकाअ यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकारी दीपककुमार मीना व जिल्हा परिषदेचे मुकाअ प्रदीप डांगे यांच्या प्रयत्नाने गोंदिया जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गापासून बचाव म्हणून गोंदिया जिल्ह्यातील पाच व्हेंटिलेटर असलेल्या रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्यात. या रुग्णवाहिकांची सेवा जिल्ह्यातील सर्व तालुुक्यांत मिळणार आहे. नगरसेवक पंकज यादव व लोकेश यादव यांनी या रुग्णवाहिका लोकांच्या सेवेत याव्यात म्हणून मुकाअ यांच्याशी चर्चा करून त्या रुग्णवाहिका लोकांच्या सेवेत दाखल करण्यात आल्या आहेत.