१५ दिवसांत प्रथमच रुग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:29 IST2021-07-31T04:29:32+5:302021-07-31T04:29:32+5:30

गोंदिया : मागील पंधरा दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत होती. त्यामुळे कोरोनाचा ग्राफ खालावला होता. मात्र, शुक्रवारी (दि.३०) ...

For the first time in 15 days | १५ दिवसांत प्रथमच रुग्णसंख्येत वाढ

१५ दिवसांत प्रथमच रुग्णसंख्येत वाढ

गोंदिया : मागील पंधरा दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत होती. त्यामुळे कोरोनाचा ग्राफ खालावला होता. मात्र, शुक्रवारी (दि.३०) प्रथमच तीन बाधितांची नोंद झाली. ही मागील पंधरा दिवसांतील सर्वाधिक रुग्णसंख्या होती. त्यामुळे रुग्णसंख्येत प्रथमच थोडी वाढ झाल्याचे चित्र होते.

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शुक्रवारी एकूण ७७३ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ६५३ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर ७९ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ३ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.४१ टक्के आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आला आहे. तर तीन तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १३ वर आली आहे. त्यामुळे जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने समाधानकारक वाटचाल सुरू आहे. मात्र, कोरोनाला पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी जिल्हावासीयांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत २१७१५१ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २१७४२९ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली आहे. यात ४१११९० नमुने कोरोनाबाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४११९० कोरोनाबाधित आढळले असून यापैकी ४०४७६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा रिकव्हरी रेट ९८.२७ टक्के आहे.

............

लसीकरणाची सहा लाखांकडे वाटचाल

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हे महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनातर्फे लसीकरणावर भर दिला जात आहे. यांतर्गत आतापर्यंत ५ लाख ८८८९० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणासाठी आता पुरेसे लसीचे डोससुद्धा आरोग्य विभागाला उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे लसीकरण मोहीम सुरळीतपणे सुरू आहे.

Web Title: For the first time in 15 days