पहिल्याच पावसात जिल्ह्यातील तलाव भरले
By Admin | Updated: July 21, 2016 01:25 IST2016-07-21T01:25:06+5:302016-07-21T01:25:06+5:30
गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला. मात्र पहिल्याच पावसात जिल्ह्यातील दिना जलाशय व इतर तलाव तुडूंब भरले आहेत.

पहिल्याच पावसात जिल्ह्यातील तलाव भरले
शेती सिंचनासाठी सोय : धान रोवणीची कामे मात्र रखडली
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला. मात्र पहिल्याच पावसात जिल्ह्यातील दिना जलाशय व इतर तलाव तुडूंब भरले आहेत. अनेक ठिकाणी तलाव भरल्यामुळे उन्हाळ्यात शेती सिंचनाची चांगली सोय निर्माण झाली आहे. अजून पावसाळ्याचे दीड ते दोन महिने बाकी असताना गडचिरोली जिल्ह्यातील तलाव भरल्यामुळे शेतकरी सध्या आनंदी आहे.
यावर्षी पाऊस समाधानकारक झाला असला तरी गडचिरोली जिल्ह्यात धानाच्या पेरण्या केवळ १३ ते १५ टक्केच जवळपासच झाल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी रोवणीसाठी टाकलेले पऱ्हे अतिवृष्टीमुळे कुजले व सडून गेले. त्यामुळे रोवणी करिता पऱ्हे मिळणे कठीण झाले आहे. पऱ्हे नसल्यामुळे रोवणीचे काम सध्या ठप्प आहे. जिल्ह्यात आतापर्यंत जिल्ह्यात ७३४.६ मिमी म्हणजे ५४.२ टक्के पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी तलावाच्या पाळ्या फुटल्याने शेतकऱ्यांचे पऱ्हे वाहून गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. अहेरी तालुका वगळता जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस यंदा झाला आहे. (प्रतिनिधी)
आतापर्यंत जिल्ह्यात ५५.५ टक्के पाऊस
२० जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्यात १०.३ मीमी पाऊस झाला आहे. गडचिरोली, कुरखेडा येथे पाऊस झाला नाही. तर आरमोरी येथे ७.३, चामोर्शी १४.८, सिरोंचा १४.४, अहेरी २८, एटापल्ली १२.८, धानोरा ४.७, कोरची ०.३, देसाईगंज २.३, मुलचेरा ३२.८, भामरागड तालुक्यात २२.६ मीमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली. ५५२ मीमी पाऊस जिल्ह्यात झाला असून यावर्षात ५५.५ मीमी पाऊस झाला असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मागील वर्षी या कालावधीपर्यंत ८८.५ मीमी पाऊस झाला होता, असेही प्रशासनाने म्हटले आहे.