भागी तालुक्यातील पहिले आदर्श मतदान केंद्र ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:34 IST2021-01-16T04:34:05+5:302021-01-16T04:34:05+5:30
मुख्याध्यापक नरेंद्र अमृतकर यांच्या संकल्पनेतून या मतदान केंद्राला लग्नमंडपासारखे सुशोभित करण्यात आले होते. मतदारांकरिता सर्व सोई उपलब्ध करुन दिल्या. ...

भागी तालुक्यातील पहिले आदर्श मतदान केंद्र ()
मुख्याध्यापक नरेंद्र अमृतकर यांच्या संकल्पनेतून या मतदान केंद्राला लग्नमंडपासारखे सुशोभित करण्यात आले होते. मतदारांकरिता सर्व सोई उपलब्ध करुन दिल्या. सर्व प्रथम मतदान केंद्रांवर येणाऱ्या मतदाराला सॅनिटाईझ करुन मास्क देण्यात आले. त्यानंतर त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. परिसरात शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वृद्ध व गर्भवती महिलांकरिता बसण्याची व्यवस्था, अपंगाकरिता व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती. केंद्रावर आरोग्य तपासणी चमू सुद्धा कार्यरत होती. अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, तहसीलदार विजय बोरुडे, बूथ निरीक्षक अनिल खडतकर, उपविभागीय अधिकारी गोंदिया कुमारसिंह सोमवंशी व विलास शिंदे यांनी भेट देऊन आदर्श मतदान केंद्राची स्तुती केली. सहायक शिक्षक सुमित चौधरी व अमोल खंडाईत यांनी सुद्धा केंद्राला सहकार्य केले