शाळेचा पहिला दिवस गणवेशातच

By Admin | Updated: June 15, 2016 02:21 IST2016-06-15T02:21:00+5:302016-06-15T02:21:00+5:30

दरवर्षी अर्धेअधिक सत्र उलटूनही गणवेश विद्यार्थ्यांना मिळत नव्हते. परंतु यावर्षी पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांना गणवेशात येण्याची व्यवस्था

The first day of school was in the uniform | शाळेचा पहिला दिवस गणवेशातच

शाळेचा पहिला दिवस गणवेशातच

२.९५ कोटीची तरतूद : ७३ हजार ८६० विद्यार्थ्यांना दोन गणवेश
गोंदिया : दरवर्षी अर्धेअधिक सत्र उलटूनही गणवेश विद्यार्थ्यांना मिळत नव्हते. परंतु यावर्षी पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांना गणवेशात येण्याची व्यवस्था म्हणून १५ दिवसापूर्वीच मुख्याध्यापकांच्या खात्यात पैसे वळते करण्यात आल्याची माहिती सर्वशिक्षा अभियानाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दिलीप बघेले यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशीच गणवेश मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
वर्ग पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यासाठी शासनाने दोन कोटी ९५ लाख ४४ हजार रूपये गोंदिया जिल्ह्याला दिले आहेत. एका विद्यार्थ्याला दोन गणवेश दिले जाणार आहेत. एका गणवेशापोटी २०० रूपये तर दोन गणवेशांसाठी ४०० रूपये एका विद्यार्थ्यामागे त्यांच्या मुख्याध्यापकांच्या खात्यात टाकण्यात आले आहे.
गणवेश अनुसूचित जाती, जमाती, दारिद्र रेषेखालील मुले व सर्व मुलींना गाणवेश दिले जातात. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ८०९६ विद्यार्थ्यांसाठी ३२ लाख ३८ हजार ४०० रूपये, आमगाव तालुक्यातील ७७०३ विद्यार्थ्यांसाठी ३० लाख ८१ हजार २०० रूपये, देवरी तालुक्यातील ६०८७ विद्यार्थ्यांसाठी २४ लाख ३४ हजार ८०० रूपये, गोंदिया तालुक्यातील २०४५८ विद्यार्थ्यांसाठी ८१ लाख ८२ हजार २०० रूपये, गोरेगाव तालुक्यातील ७६२४ विद्यार्थ्यांसाठी ३० लाख ४९ हजार ६०० रूपये, सालेकसा तालुक्यातील ६२९३ विद्यार्थ्यांसाठी २५ लाख १७ हजार २०० रूपये, सडक-अर्जुनी तालुक्यातील ६८८८ विद्यार्थ्यांसाठी २७ लाख ५५ हजार २०० रूपये, तिरोडा तालुक्यातील १०७११ विद्यार्थ्यांसाठी ४२ लाख ८४ हजार ४०० रूपये मुख्याध्यापकांच्या खात्यात टाकण्यात आले आहे.
जिल्ह्यातील एकूण ७३ हजार ८६० विद्यार्थ्यांसाठी २ कोटी ९५ लाख ४४ हजार रूपये पाठविण्यात आले आहेत. गणवेशासाठी देण्यात येणारा निधी मुख्याध्यापकांच्या बँक खात्यावर वळता करण्यासाठी चार दिवसापूर्वीच पाठविला असल्याची माहिती सर्वशिक्षा अभियानाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दिलीप बघेले यांंनी दिली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The first day of school was in the uniform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.