रेल्वेच्या इलेक्ट्रीक केबीनला आग
By Admin | Updated: November 17, 2015 03:42 IST2015-11-17T03:42:55+5:302015-11-17T03:42:55+5:30
रेलटोली परिसरातील रेल्वेच्या तिकीट घराच्या मागील भागात सोमवारी (दि.१६) दुपारी अचानक आग लागली. या

रेल्वेच्या इलेक्ट्रीक केबीनला आग
गोंदिया : रेलटोली परिसरातील रेल्वेच्या तिकीट घराच्या मागील भागात सोमवारी (दि.१६) दुपारी अचानक आग लागली. या आगीमुळे तिकीट घरातील इलेक्ट्रीकल कॅबीनचे थोडेफार जळाले असून एसीही जळाले.
रेलटोली परिसरातील रेल्वे तिकीट घराच्या मागील भागात मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. या झाडांची वाळलेली पाने व कचरा तेथेच पडून राहतो. सोमवारी (दि.१६) दुपारी या वाळलेल्या पानांत अचानक आग लागली. या आगीने भडका घेतल्याने तिकीट घरातील इलेक्ट्रीक सप्लाय केबीन थोडेफार जळाले.
तर केबीनमध्ये असलेले एसीही जळाले. शिवाय केबीनमध्ये धूर पसरला होता. परिणामी थोड्यावेळासाठी संपूर्ण सिस्टम बंद करावे लागले होते. या आगीमुळे सुमारे ५० हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे रेल्वे स्टेशन प्रबंधक रविनारायण कार यांनी सांगीतले. (शहर प्रतिनिधी)