शेतातील धानाच्या पुंजण्याला आग

By Admin | Updated: November 13, 2015 01:45 IST2015-11-13T01:45:05+5:302015-11-13T01:45:05+5:30

सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील ग्राम रेंगेपार येथील शेतकरी रामचंद्र रामलाल पारधी (५६) यांनी आपल्या शेतातील धान कापून पुंजना तयार केला होता.

Fire in the dustbin of the field | शेतातील धानाच्या पुंजण्याला आग

शेतातील धानाच्या पुंजण्याला आग


पांढरी : सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील ग्राम रेंगेपार येथील शेतकरी रामचंद्र रामलाल पारधी (५६) यांनी आपल्या शेतातील धान कापून पुंजना तयार केला होता. १० नोव्हेंबर रोजी ३.३० वाजताच्या सुमारास अज्ञात इसमांनी त्यांच्या पुंजन्याला आग लावली.
गावकऱ्यांनी ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु यात शेतकऱ्याचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. सदर व्यक्तीने पिक कर्जसुद्धा घेतलेले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी आली आहे.
या प्रकरणाची चौकशी येथील तलाठी एस.के. कापसे यांनी करून पंचनामा तयार केला. सदर शेतकऱ्याला चार हेक्टरमधील पिकाचा मोबदला देण्यात यावा अशी मागणी सरपंच निता निरजकुमार मेश्राम, हलबीटोला येथील पोलीस पाटील कृष्णकुमार बोपचे, दामोदर बोपचे व गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Fire in the dustbin of the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.