बाराभाटी व पांढरीत दोन घरांना आग

By Admin | Updated: February 24, 2017 01:51 IST2017-02-24T01:51:53+5:302017-02-24T01:51:53+5:30

येथील मिलिंद रामटेके यांच्या नवनिर्मित घरकूल आवाराला लागलेल्या आगीने घरामधील २ लाखांचा ऐवज भस्मसात झाला.

Fire brigade and two houses in white | बाराभाटी व पांढरीत दोन घरांना आग

बाराभाटी व पांढरीत दोन घरांना आग

महिला भाजली : कुलर व साहित्य जळाले
बोंडगावदेवी/पांढरी : येथील मिलिंद रामटेके यांच्या नवनिर्मित घरकूल आवाराला लागलेल्या आगीने घरामधील २ लाखांचा ऐवज भस्मसात झाला. सामान काढत असताना त्यांची पत्नी सुद्धा किरकोळ प्रमाणात भाजली. घराशेजारील व गावातील युवकांच्या सतर्कतेने तब्बल दोन तासांनी आग आटोक्यात आणता आली. बुधवारच्या रात्री ८ वाजता आग लागल्याने मिलिंदचे कुटूंब उघड्यावर आले.
येथील बाराभाटी-दिघोरी मार्गालगत अंगणवाडीजवळ मिलींद रामटेके (४५) यांनी इंदिरा आवास योजनेंतर्गत घराचे बांधकाम केले. घराचे बांधकाम अर्धवट असल्यामुळे तिथे उडूल व खसपासून तयार केलेल्या कुलर ताट्यांचे गढ्ढे, शेळ्या व ईतर साहित्य ठेवले जात होते. जवळपास ८ वाजताच्या दरम्यान लागलेल्या आगीने खस पाट्याच्या गठ्ठ्यांनी आग भडकली. आगीत सापडलेल्या बकऱ्यांना वाचविण्यासाठी मिलींद यांची पत्नी रत्नमाला जळत्या घरात जावून बकऱ्यांना सोडत असताना तिच्या हाताला आस लागली. १०८ क्रमांकावर भ्रमणध्वनी लावून रुग्णवाहिका बोलवून साकोली रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर भंडारा येथील शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दोन विहिरीमध्ये मोटर लावून त्याद्वारे पाण्याचा मारा करुन आग विझविण्यासाठी तब्बल २ तास युवकांनी शर्तीचे प्रयत्न केले. डॉ.राजेश रामटेके यांनी गॅसच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यासाठी धडपड केली. घरकुलामध्ये ठेवण्यात आलेले जवळपास २ लाखांचे साहित्य क्षर्णाधात आगीत भस्मसात झाल्याने रामटेके यांच्या कुटूंबाची आर्थिक वाताहात झाली. वनमजुरी करुन हे कुटुंब चरितार्थ चालवितात.

Web Title: Fire brigade and two houses in white

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.