गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By Admin | Updated: March 12, 2017 00:21 IST2017-03-12T00:21:24+5:302017-03-12T00:21:24+5:30
प्रगती विद्यालय सरांडी येथे गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार व निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
सरांडी : प्रगती विद्यालय सरांडी येथे गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार व निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला आ.विजय रहांगडाले होते.
कार्यक्रमाची सुरूवात शारदा मातेचे व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत गीताने स्वागत करण्यात आले. अध्यक्षस्थानी पं.स.चे उपसभापती डॉ. किशोर पारधी, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, संस्था अध्यक्ष माणीक वाणी, पं.स.सदस्य बी.एस.रहांगडाले, मनोहर राऊत, जया धावडे, क्रीडा अधिकारी अनिल निमगडे, गटशिक्षणाधिकारी सुनिल मांढरे, सरपंच शोभा काम्ंबली, यशवंत कांबली, नाशिरभाई कुरैशी, वरिष्ठ विस्तार अधिकारी प्रदीप समरीत, उपसरपंच शामराव भोंगाडे, पोलीस पाटील रामकृष्ण लांजेवार, येळे, पराते, टेंभरे, डॉ. पाटील, निनावे, मुख्याध्यापक रामसागर धावडे, माणिक बदने उपस्थित होते.
मार्च २०१६ मध्ये शाळेत प्रथम आलेला शुभम सुकराम कावळे यांचा आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते १००१ रुपये रोख व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. द्वितीय क्रमांकावर राहिलेला भोजराज कृष्णा ठवकर यांचा सुध्दा ५०१ रुपये रोख व स्मृतिचिन्ह देवून गौरव करण्यात आला. याप्रसंगी आ.विजय रहांगडाले यांनी शाळेत बोअरवेल व डिजीटल वर्ग करून देण्यास सहकार्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी डॉ. किशोर पारधी, सुभाष गांगरेड्डीवार, पं.स.सदस्य मनोहर राऊत, जया धावडे, शामरा भोंगाडे यांनी मार्गदर्शन केले. संचालन एन.डी.बडगे तर आभार सी.एस.चौधरी यांनी मानले.
यशस्वीतेसाठी पटले, ए.एस.कडव, आर.एच.मलेवार, आय.एस.नंदेश्वर, शकील शेख, धावडे, देवगिरकर, अनिता वाणी, जीवन धावडे, वहिले यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)