लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगरपरिषद, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकांचा मुहूर्त निघाला असून त्यानुसार शासन-प्रशासन कामाला लागले आहे. जिल्ह्यात फक्त नगरपरिषद व नगर पंचायतच्याच निवडणुका होत असून त्यानुसार प्रशासन व निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांकडून तयारी सुरू झाली आहे. तर सर्वसामान्य नागरिक व नवमतदारांना मात्र मतदार यादीत आपले नाव आहे की नाही याची उत्सुकता लागून असते. अशांसाठी निवडणूक आयोगाने एक लिंक उपलब्ध करवून दिली असून त्याद्वारे आता घरबसल्या मतदार यादीतून आपले नाव शोधून घेता येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी वापरण्यात येत आहे. त्या आधारे तयार करण्यात आलेल्या जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय तसेच नगरपरिषद नगर पंचायतसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळाची लिंक राज्य निवडणूक आयोगाच्या https://mahasec.maharashtra.g ov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
विशेष म्हणजे, राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद -नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील नावे https://mahasecvoterlist.in/ या संकेतस्थळावर शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नवमतदारांत प्रथम मतदानाचा उत्साह
मतदानाला घेऊन पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नवमतादारांमध्ये जास्त उत्सुकता असते, कारण ही त्यांची पहिलीच वेळ असते. अशात या नवमतदारांमध्ये मतदानाला घेऊन जास्त उत्सुकता आहे. यामुळेच ते मतदार यादीत आपले नाव आले की नाही हे बघण्यासाठी उत्सुक आहेत. अशात आता त्यांना संकेतस्थळावर जाऊन आपले नाव शोधून घेता येणार आहे.
कार्यालयात उपलब्ध असणार मतदार यादी
जिल्ह्यात सध्या फक्त दोन नगरपरिषद व दोन नगर पंचायतच्या निवडणुका होत आहेत. यासाठी त्यांची प्रारूप मतदार यादीची छायांकित प्रत संबंधित नगर परिषद-नगर पंचायतच्या कार्यालयात उपलब्ध राहणार आहे. या मतदार यादी हवी असल्यास त्यासाठी प्रतिपृष्ठ दोन रूपये प्रमाणे शुल्क भरावे लागणार आहे.
१,२४,३११ शहरात मतदार
१ जुलै २०२५ रोजीच्या मतदार यादीनुसार शहरात एक लाख २४ हजार ३११ मतदार आहेत. यामध्ये ५९ हजार ६८७ पुरुष, ६४ हजार ६१६ महिला तर ८ तृतीयपंथी मतदार आहेत. म्हणजेच, आता या मतदार राजांच्या हातात शहरात कुणाच्या गळ्यात विजयाची माळ घालायची अन् कुणाला पराजयाची चव चाखायला लावायची याची चावी आहे. मात्र प्रारूप मतदार यादीवर येत्या १३ ऑक्टोबरपर्यंत हरकती घेतल्या जाणार आहेत. यामुळे या मतदार संख्येत थोडाफार बदल होण्याची शक्यता आहे
Web Summary : With local elections approaching, voters can now easily check the voter list online. The Election Commission has provided a link to search for names on https://mahasecvoterlist.in/. The draft voter list is available at municipal offices for a fee. 1,24,311 voters are in the city.
Web Summary : स्थानीय चुनावों के साथ, मतदाता अब आसानी से ऑनलाइन मतदाता सूची की जांच कर सकते हैं। चुनाव आयोग ने https://mahasecvoterlist.in/ पर नाम खोजने के लिए एक लिंक प्रदान किया है। मसौदा मतदाता सूची शुल्क पर नगर निगम कार्यालयों में उपलब्ध है। शहर में 1,24,311 मतदाता हैं।