शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

बीडटोला व भुरसीटोला गावाला समस्यांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 11:33 PM

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गट ग्रामपंचायत सोमलपूर अंतर्गत येत असलेली बीडटोला व भुरसीटोला ही दोन्ही गावे विकासापासून कोसो दूर आहेत.

ठळक मुद्देमार्कंड बडवाईक : स्वतंत्र ग्रामपंचायत तयार करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गट ग्रामपंचायत सोमलपूर अंतर्गत येत असलेली बीडटोला व भुरसीटोला ही दोन्ही गावे विकासापासून कोसो दूर आहेत. गावात विविध समस्या असून अद्यापही त्या मार्गी न लावल्याने गावकऱ्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.मागील २० ते २५ वर्षापूर्वी या गावात तयार केलेला ५०० मीटरचा रस्ता पूर्णपणे उखडला असून त्यावरुन वाहने तर सोडा पायी चालणे देखील कठीण झाले आहे. गावातील समस्यांकडे प्रशासनाचे सुद्धा दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप बीडटोला ग्रामपंचायतचे उपसरपंच मार्कंड बडवाईक यांनी केला आहे. नवेगावबांध जिल्हा परिषद क्षेत्रात सोमलपूर गट ग्रामपंचायतमध्ये बीडटोला गावाचा समावेश होता. तसेच भुरसीटोला गावाचाही समावेश या गट ग्रामपंचायतमध्ये होता. निवडणुका आल्या की एक सुरक्षीत मतदार म्हणून या गावाकडे सोमलपूर येथील राजकारणी बघत असतात.आपली सत्ता आली की बीडटोला किंवा भुरसीटोला या गावाला उपसरपंच पद देवून पुढील पाच वर्षे ग्रामपंचायतवर सत्ता गाजविण्याचा प्रकार मागील २५ वर्षांपासून सुरू आहे.भुरसीटोला, बीडटोला या गावातील मुख्य रस्त्यांची अवस्था फारच दयनिय आहे. सोमलपूर, बीडटोला व भुरसीटोला ही तीन गावे मिळून ही ग्रामपंचायत तयार झाली असली तरी बीडटोला व भुरसीटोला ही गावे विकासापासून कोसो दूर आहेत. मुंगली ते बाक्टी मार्गावरुन बीडटोला गावाकडे जाण्याच्या मार्गावर पुढील कॅनलपर्यंत ५०० मीटरचा रस्त्याचे डांबरीकरण २५ वर्षांपूर्वी करण्यात आली.तर कॅनलपासून सानगडी-नवेगावबांध मार्गापर्यंत ६०० मीटरचा भुरसीटोला गावातील मुख्य रस्ताही दहा पंधरा वर्षापूर्वी तयार केला होता. मात्र आता या दोन्ही रस्त्यांची फारच दयनिय अवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावर नागरिकांना पायी चालणे सुध्दा कठीण झाले आहे.त्यामुळे बीडटोला, बीडटोली, भिमनगर व भुरसीटोलाच्या नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. तर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत मोडकळीस आली आहे. पिण्याच्या पाण्याची सुध्दा पुरेशी व्यवस्था नाही. अंगणवाडीची इमारत जीर्ण झाली असून ही इमारत केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र त्याच इमारतीत अद्यापही चिमुकल्यांवर संस्कार केले जात आहे.योजनांपासून कोसो दूरबीडटोला व भुरसीटोला येथील गावकरी अद्यापही शासनाच्या विविध विकासात्मक योजनांपासून कोसो दूर आहेत. शासनाच्या योजना अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहचल्याच नाही. स्वच्छ भारत योजनेतंर्गत शौचालयाचा लाभ सुध्दा येथील गावकºयांना मिळाला नाही.स्वतंत्र ग्रामपंचायत तयार करासोमलपूर ग्रामपंचायत बीडटोला व भुरसीटोला या गावाची विकासाबाबत उपेक्षा करीत आहे. त्यामुळे भुरसीटोला व बीडटोला गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत तयार करावी. सोमलपूर ग्रामपंचायतचे या गावांकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या गावांना सोमलपूर ग्रामपंचायतमधून वगळण्यात यावे. या दोन्ही गावांच्या विकासासाठी ग्रामपंचायतने पावले उचलण्याची मागणी गावकºयांनी केली आहे.