शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

धान उत्पादकांचे आर्थिक शोषण

By admin | Updated: May 9, 2014 03:15 IST

तालुक्यात तलावाच्या पाण्याने रबी (धान) पिकविल्या जात आहे. खरीप हंगामात वेळोवेळी पाऊस आल्याने धानावर किडींचा प्रादुर्भाव व विविध रोगांची लागण झाल्याने

खरेदी केंद्र नाही : बाजार समितीत कमी दरात खरेदी

तिरोडा : तालुक्यात तलावाच्या पाण्याने रबी (धान) पिकविल्या जात आहे. खरीप हंगामात वेळोवेळी पाऊस आल्याने धानावर किडींचा प्रादुर्भाव व विविध रोगांची लागण झाल्याने शेतकर्‍यांना धानाचे उत्पादन फारच कमी झाले. परंतु तलावात पाणी भरपूर वाचल्याने रबीची लागवड जास्त झाली. परंतू आता खरेदी केंद्रच सुरु करण्यात आले नसल्याने व कृ.उ.बा.स. मध्ये आधारभूत किमतीपेक्षा (१३१0) कमी किमतीत धान खरेदी केल्या जात असल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी गोंदिया यांनी तत्काळ लक्ष घालून शक्य तितक्या लवकर आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकर्‍यांच्यावतीने केली जात आहे.
तालुक्यात चोरखमारा, बोदलकसा, खळबंदा, धापेवाडा उपसा जलसिंचन व मोटारपंपाद्वारे शेतीला सिंचित करण्यात येत आहे. रबी हंगामातील धान निघायला सुरुवात झाली आहे. परंतु धान खरेदी केंद्र सुरु झालेली नाही.
आधीच कधी अतवृष्टी, कधी गारपीट तर कधी किडींचा प्रादुर्भाव अशा विविध संकटांनी ग्रस्त शेतकरी आता कुणाकडून घेतलेले उसणवारीचे पैसे परत करावे लागणार या चिंचेत आहे. इकडे धानाला भाव न मिळाल्याने अधिक चिंतीत झालेला आहे. दुसरीकडे व्यापारी-दलाल- कृ.उ.बा.स.चे संचालक व समितीचे अधिकारी, पदाधिकारी हे मात्र आपसात साटे-लोटे करुन शेतकर्‍यांचे शोषण करण्यात मग्न असल्याचे बोलले जाते. शासन याबाबात थातूर-माथूर कार्यवाही करुन धृतराष्ट्राची भूमिका बजावत आहे.
तालुक्यात अजुनपर्यंत एकही धान खरेदी केंद्र सुरु झालेले नाही. त्यामुळे नाइलाजास्तव खाजगी व्यापार्‍याला कमी किमतीत धानाची विक्री शेतकर्‍यांला करावी लागत आहे. तालुक्यात वडेगाव, भजेपार, मारेगाव, सातोना, लाखेगाव, विहिरगाव, विर्सी, ठानेगाव, गराडा, मेंढा, सुकडी, परसवाडा, अर्जुनी, इंदोरा, चिरेखानी, तिरोडा, गुमाधावडा अशा विविध गावातील शेतकरी रबी पिकांची लागवड जास्त प्रमाणात करतात. (शहर प्रतिनिधी)