शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीमुळे टरबूज उत्पादकांवर आर्थिक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 05:00 IST

सडक अर्जुनी तालुक्यातील सिंदीपार, चिचटोला, कोकणा, कोसमतोंडी, रेंगेपार, बकी, मेंडकी, मनेरी,पांढरी, मलिजुंगा, सौंदड, शेंडा परिसरातील शेतकरी रब्बी हंगामादरम्यान टरबूज आणि डांगराची लागवड करतात.या भागातील टरबूज देशात आणि देशाबाहेर सुध्दा पाठविले जातात.

ठळक मुद्देहंगाम गमाविण्याची वेळ : कोरोनाचाही परिणाम, लागवड खर्चही भरुन निघणे कठीण

राजेश मुनीश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : मागील महिनाभरापासून सातत्याने अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने याचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला आहे. तर अवकाळी पावसामुळे टरबूज, डांगरू उत्पादक शेतकऱ्यांना सुध्दा याचा फटका सहन करावा लागत आहे. अवकाळी पाऊस व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे मालाची वाहतूक होत नसल्याने बºयाच प्रमाणात माल जागेवरच सडत असल्याने टरबूज उत्पादकांवर आर्थिक संकट कोसळले आहे.सडक अर्जुनी तालुक्यातील सिंदीपार, चिचटोला, कोकणा, कोसमतोंडी, रेंगेपार, बकी, मेंडकी, मनेरी,पांढरी, मलिजुंगा, सौंदड, शेंडा परिसरातील शेतकरी रब्बी हंगामादरम्यान टरबूज आणि डांगराची लागवड करतात.या भागातील टरबूज देशात आणि देशाबाहेर सुध्दा पाठविले जातात. त्यामुळे तीन महिन्याचा कालावधी टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.मात्र यंदा सातत्याने येणाऱ्या अवकाळी पावसामुळे टरबूज उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. गारपीट आणि पावसामुळे टरबूज खराब होत असल्याने त्यांची विक्री न करता ते तसेच फेकून देण्याची वेळ टरबूज उत्पादक शेतकºयांवर आली आली आहे.सिंदीपार येथील ओंकार लजे, जोशीराम लंजे, चंदू लंजे, सेवकराम लंजे, सुरेश गहाणे, केवळराम लजे, कैलाश लंजे, आदी शेतकºयांनी २२५ एकरात टरबूज पिकाची लागवड केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावीत असल्यामुळे टरबूज व डांगरू पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. फळ बरोबर आले नाही, काही प्रमाणात फळ आले तर फळांना मागणी नसल्याने हाती आलेले पीक शेतात तसेच पडून आहे.सध्या कोरोनाचा प्रकोप वाढल्याने, लॉकडाऊन असल्यामुळे कुणीही घरा बाहेर पडत नसल्याने टरबुजाची मागणी कमी झाली आहे. परिणामी या शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च निघणे सुध्दा कठीण आहे.सडक अर्जुनी तालुक्यातील सिंदीपार गावात २२५ एकर शेतीत टरबूज व डांगरू पिकाची लागवड केली आहे.सध्याची परिस्थिती पाहता लागवड खर्च सुध्दा भरुन निघणे कठीण असल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. टरबूज उत्पादक शेतकºयांनी स्थिती पाहता त्यांना शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे.गेल्या वर्षी माझ्या शेतात खर्च वजा करता निवळ नफा चार लाख रूपये मिळाला होता.पण यावर्षी नफा मिळणे कठीण असून केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणे कठीण आहे.- चंदू लंजे, शेतकरी सिंदीपारमी माझ्या सात एकरात डांगरू पिकाची लागवड केली आहे. मात्र अवकाळी पावसामुळे डांगराच्या वेलावर किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने फळ बरोबर आले नाही.कोरोनामुळे डांगरांना मागणी नसल्याने केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघण्याची शक्यता कमी आहे.- ओंकार लंजे, शेतकरी

टॅग्स :Rainपाऊस