नेशनफर्स्ट फाउंडेशनकडून टेंभरे कुटुंबीयांना आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:29 IST2021-07-31T04:29:06+5:302021-07-31T04:29:06+5:30

राकेश टेंभरे यांनी १९ जुलै रोजी विष प्राशन केल्याने त्यांना गोंदियातील केटीएस रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र २६ ...

Financial assistance to the Tembhare family from the Nationfirst Foundation | नेशनफर्स्ट फाउंडेशनकडून टेंभरे कुटुंबीयांना आर्थिक मदत

नेशनफर्स्ट फाउंडेशनकडून टेंभरे कुटुंबीयांना आर्थिक मदत

राकेश टेंभरे यांनी १९ जुलै रोजी विष प्राशन केल्याने त्यांना गोंदियातील केटीएस रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र २६ जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला. आता त्यांच्या कुटुंबात पत्नी चंद्रकला (२८), मुलगा वंश (६) व मुलगी नव्या (३) उरले आहेत. अत्यंत कमी वयात चंद्रकला विधवा झाल्या असून दोन्ही चिमुकले पोरके झाले आहेत. अशात या कुटुंबाला नेशनफर्स्ट फाउंडेशनतर्फे दरमहा २५०० रुपयांची मदत केली जाणार असून फाउंडेशनचे रविकुमार गुप्ता, नरेश तागडे, अशोक लांजेवार, नावेद शेख, अजय बिसेन, प्रशांत ऊईके, संतोष कावरे, लालेश्वर टेंभरे, प्रवीण ताकसांडे, चांदनी लेवादे, राहुल बोरकर यांनी मंगळवारी (दि. २७) पहिली आर्थिक मदत घरी पोहोचवून दिली. त्याचप्रमाणे शिवसेना तालुकाप्रमुख कुलतारसिंह भाटिया, जिल्हा उपप्रमुख सोहन क्षीरसागर, विशाल दशरिया व अन्य सामाजिक कार्यकर्ते मदतीसाठी सरसावले आहेत. टेंभरे कुटुंबीयांची मदत करा, असे नेशनफर्स्ट फाउंडेशनने कळविले आहे.

Web Title: Financial assistance to the Tembhare family from the Nationfirst Foundation