आदिवासी समाजातील गरजुंना आर्थिक मदत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 21:58 IST2018-07-23T21:58:08+5:302018-07-23T21:58:31+5:30
आदिवासी समाजातील लोकांचे जीवनमान व आर्थिक स्तर उंचावण्याकरीता राज्य सरकारने आदिवासी लोकांना अन्नधान्य आणि आर्थिक स्वरुपात मदत करावी अशी मागणी करीत काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

आदिवासी समाजातील गरजुंना आर्थिक मदत करा
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : आदिवासी समाजातील लोकांचे जीवनमान व आर्थिक स्तर उंचावण्याकरीता राज्य सरकारने आदिवासी लोकांना अन्नधान्य आणि आर्थिक स्वरुपात मदत करावी अशी मागणी करीत काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
या वेळी दिलेल्या निवेदनातून आदिवासी समाज हा जंगलात राहत असून त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतकरी व शेतमजुरांना दरवर्षी पावसाळ्यात पैशांची अधिक गरज असते. अशा बिकट परिस्थितीत त्यांना आपले घर व कुटूंब चालविण्याकरीता तारेवरची कसरत करावी लागते. आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रामध्ये वर्ष २०१५-१६ व वर्ष २०१७-१८ मध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला. त्यामुळे या क्षेत्रातील आदिवासी समाजातील शेतकरी व शेतमजूर आर्थिकरित्या कमजोर झाला आहे. राज्य सरकारने आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील आदिवासी समाजातील गरजू व गरीब शेतकरी शेतमजुरांना त्यांच्या कुटूंबातील व्यक्तीच्या संख्येनुसार अन्नधान्य व रोख रकमेचा स्वरुपात आर्थिक मदत जाहीर करावी. जेणेकरुन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे जीवनमान व आर्थिक स्तर उंचाविण्यात मदत होईल. अशी मागणी कोरोटे यांनी केली आहे. या मागणीला घेवून त्यांनी लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या मार्गदर्शन व यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी विकास मंत्री सावरा यांना नागपूर विधानभवनात निवेदन सादर दिले.