अखेर संजय विश्वकर्मा यांचा पदभार काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:36 IST2021-02-25T04:36:57+5:302021-02-25T04:36:57+5:30

गोंदिया : येथील लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संजय विश्वकर्मा यांच्याकडे जि.प.चा सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामीण विकास यंत्रणेचा कारभार ...

Finally Sanjay Vishwakarma took over | अखेर संजय विश्वकर्मा यांचा पदभार काढला

अखेर संजय विश्वकर्मा यांचा पदभार काढला

गोंदिया : येथील लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संजय विश्वकर्मा यांच्याकडे जि.प.चा सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामीण विकास यंत्रणेचा कारभार देण्यात आला होता; परंतु ते काम करीत नसल्यामुळे त्यांची तक्रार लोकप्रतिनिधींनी ग्रामविकास मंत्री यांच्याकडे केली होती. त्या तक्रारीच्या आधारावर मुकाअ यांनी ग्रामीण विकास यंत्रणेचा पदभार काढून हरिणखेडे यांना तर सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता पदभार ललित मुंदडा यांच्याकडे सोपविला आहे.

बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंताचा पदभार सांभाळताना संजय विश्वकर्मा हे आर्थिक व्यवहार केल्याशिवाय काम करीत नाही, आरोप केला होता. तसेच याबाबतची तक्रार लोकप्रतिनिधींनी ग्रामविकास राज्यमंत्र्याकडे केली होती. त्या तक्रारीची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे यांनी ग्रामीण विकास यंत्रणेचा पदभार काढून हरिणखेडे यांना यापूर्वीच दिला तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंतापदाचा कार्यभार काढून ललित मुंदडा यांच्याकडे सोपविला आहे. मुंदडा यांनी कार्यकारी अभियंतापदाची सुत्रे स्वीकारली आहेत.

Web Title: Finally Sanjay Vishwakarma took over