अखेर १२ अभियंत्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: April 22, 2017 02:34 IST2017-04-22T02:34:07+5:302017-04-22T02:34:07+5:30
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात रिक्त असलेल्या अभियंत्यांची पदे पदोन्नतीने भरण्यासाठी अनेक वेळा

अखेर १२ अभियंत्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा
स्थायी समिती शांततेत : शिक्षकांच्या पेन्शनप्रकरणात लिपीक बिसेन निलंबित
गोंदिया : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात रिक्त असलेल्या अभियंत्यांची पदे पदोन्नतीने भरण्यासाठी अनेक वेळा सभेत चर्चा होऊनही प्रत्यक्ष कारवाई होत नव्हती. अखेर शुक्रवारी (दि.२१) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत विरोधीपक्ष नेता गंगाधर परशुरामकर यांनी हा विषय छेडल्यानंतर १२ अभियंत्यांना पदोन्नती देण्याचा आदेश काढत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सी.एल. पुलकुंडवार यांनी बैठकीत दिली.
याशिवाय सेवानिवृत्त शिक्षकांना मिळणाऱ्या पेन्शनचे ६ कोटी रुपये लेखा विभागातील लिपिकाच्या दिरंगाईमुळे ३१ मार्च रोजी शासनाकडे परत गेले. याला जबाबदार असणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी परशुरामकर यांनी केल्यानंतर सीईओ पुलकुंडवार यांनी त्यासाठी बिसेन नामक लिपिकाला जबाबदार धरून त्यांना निलंबित करीत असल्याचे यावेळी सांगितले. जिल्हा परिषदेची दि.१६ रोजी कोरमअभावी तहकूब झालेली स्थायी समितीची बैठक शुक्रवारी घेण्यात आली. त्या सभेत ठेवलेल्या विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. विशेष म्हणजे यापूर्वीची सभा शिक्षण सभापती पी.जी. कटरे आणि राष्ट्रवादीच्या जि.प.सदस्य सुनिता मडावी यांच्यात झालेल्या वादावादी व मारहाणीच्या घटनेने गाजली होती. त्यानंतर दि.१६ ला आयोजित सभा कोरमअभावी रद्द करावी लागली. ती सभा शुक्रवारी शांततेत पार पडली. (जिल्हा प्रतिनिधी)