अखेर उपजिल्हा रुग्णालयातील ओपीडी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:29 IST2021-05-21T04:29:39+5:302021-05-21T04:29:39+5:30

आमदार वंजारी यांनी तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत रुग्णालयात कोरोना संबंधित आढावा बैठक घेतली. बैठकीत ...

Finally the OPD at the sub-district hospital started | अखेर उपजिल्हा रुग्णालयातील ओपीडी सुरू

अखेर उपजिल्हा रुग्णालयातील ओपीडी सुरू

आमदार वंजारी यांनी तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत रुग्णालयात कोरोना संबंधित आढावा बैठक घेतली. बैठकीत कोरोनामुळे ओपीडी बंद असून त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावर आमदार वंजारी यांनी वैद्यकीय अधीक्षकांना ओपीडी सुरू करण्यासाठी आग्रह केला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते मान्य करून तत्काळ प्रभावाने ओपीडी सुरू केली. यावर तिरोडा तालुका काँग्रेस कमिटीकडून त्यांचे कौतुक करण्यात आले. याप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष राधेलाल पटले, शहर अध्यक्ष चव्हाण, प्रदेश दलित आघाडी उपाध्यक्ष पवन मोरे, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष ओम पटले, शहर महासचिव सलाम शेख, संजय खियानी, शिवा यादव, संजय जमूलकर, दीपक नंदेश्वर, किरण श्रीपत्री, दामू यरपुडे व अन्य उपस्थित होते.

Web Title: Finally the OPD at the sub-district hospital started