अखेर हिरडामाली येथील नाल्याचा मार्ग झाला मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:28 IST2021-07-31T04:28:55+5:302021-07-31T04:28:55+5:30

गोरेगाव : तालुक्यातील हिरडामाली या गावातील संपूर्ण पाणी गोरेगाव गोंदिया या मुख्य मार्गावरून नाल्यात जात होते. पण गैरअर्जदार ...

Finally, the nallah road at Hirdamali became clear | अखेर हिरडामाली येथील नाल्याचा मार्ग झाला मोकळा

अखेर हिरडामाली येथील नाल्याचा मार्ग झाला मोकळा

गोरेगाव : तालुक्यातील हिरडामाली या गावातील संपूर्ण पाणी गोरेगाव गोंदिया या मुख्य मार्गावरून नाल्यात जात होते. पण गैरअर्जदार यांनी या पाणी जाणाऱ्या नाल्यावर अतिक्रमण करून भरण भरल्यामुळे पाणी जाण्यास अडचण निर्माण झाली होती. अखेर मार्गावरील अतिक्रमण हटविल्यानंतर नाल्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हिरडामाली येथील गावातील पाणी या नाल्यातून गावनिर्मितीपासून जात होते. मात्र गैरअर्जदाराने भरण भरून पाण्याचा मार्ग बुझविला होता. याची रितसर तक्रार शेतकरी अभिषेक जैन यांनी तहसीलदार गोरेगाव यांच्याकडे केली होती. यावर तहसीलदार गोरेगाव यांनी शहानिशा करून अतिक्रमित जागेवर खोदकाम करून गुरुवारी पाण्याची वाट मोकळी करून दिली. यावेळी हिरडामालीजवळ मुख्य मार्गावर काही वेळासाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अतिक्रमण झालेल्या परिसरातील काही शेती पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दिवसभर हिरडामाली येथील नागरिकांनी नाल्याचा रस्ता तयार करा अन्यथा रस्ता रोको आंदोलन करू, असा इशारा प्रशासनाला दिला होता. गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत नाला बनविण्याचे काम सुरू होते. यावेळी हिरडामाली येथील रहिवासी माजी खासदार खुशालचंद्र बोपचे, गावातील बहुसंख्य नागरिक, तहसीलदार सचिन गोस्वावी, पोलीस निरीक्षक सचिन मैत्रे, मंडळ अधिकारी, तलाठी उपस्थित होते. अतिक्रमण हटविताना कुठलीही समस्या निर्माण होऊ नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

Web Title: Finally, the nallah road at Hirdamali became clear