अखेर निवडणुकीत लागल्या बसगाड्या
By Admin | Updated: October 14, 2014 23:19 IST2014-10-14T23:19:50+5:302014-10-14T23:19:50+5:30
पैसे दिल्याशिवाय बसगाड्या देणार नाही, अशी भूमिका घेणारे एसटी महामंडळ अखेर नरमले आणि त्यांनी विनातक्रार आपल्या बसगाड्या निवडणूक यंत्रणेच्या सेवेत दिल्या आहेत. त्यामुळे निवडणूक

अखेर निवडणुकीत लागल्या बसगाड्या
गोंदिया : पैसे दिल्याशिवाय बसगाड्या देणार नाही, अशी भूमिका घेणारे एसटी महामंडळ अखेर नरमले आणि त्यांनी विनातक्रार आपल्या बसगाड्या निवडणूक यंत्रणेच्या सेवेत दिल्या आहेत. त्यामुळे निवडणूक विभागाला एसटी महामंडळाच्या बसेसचा लाभ व निवडणूक विभागाकडून एसटी महामंडळाला ेआर्थिक लाभ मिळणार आहे.
प्रत्येक निवडणुकीत मनुष्य बळ व मतदान मशीन पोहोचविण्यासाठी एसटी महामंडळाशी करार करून बसेस पुरविल्या जातात. मात्र निवडणूक विभागाकडून ठराविक कालावधीत किंवा निवडणुकीनंतर एका महिन्याच्या आत महामंडळाला पेमेंट केले जात नाही. तसेच कधी अग्रीम रक्कमसुद्धा जमे केले जात नाही. गोंदिया आगाराने लोकसभा निवडणुकीत अग्रीम रक्कम न मिळाल्यावरही बसेस पुरविल्या होत्या. त्यावेळच्या उर्वरित रकमेचा शेवटचा हप्ता आता विधानसभा निवडणुकीच्या तीन दिवसांपूर्वी मिळाला. याशिवाय सन २०१० मधील ग्रामसभा निवडणुकीत बसेस दिल्याची रक्कम अद्यापही न मिळाल्याने गोंदिया आगाराने आधी पेमेंट करा, तेव्हाच बसेस पुरवू अशी भूमिका घेतली होती व आगारप्रमुख गौतम शेंडे आपल्या भूमिकेवर ठाम होते. या प्रकाराने निवडणूक विभागाची तारांबळ उडाली होती.
याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच निवडणूक अधिकाऱ्यांनी गोंदियाचे आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांच्याशी चर्चा केली. चर्चेत गोंदिया उपविभागासाठी व देवरी उपविभागासाठी पुरविण्यात येणाऱ्या बसेससाठी अग्रीम रक्कम म्हणून प्रत्येकी साडे तीन लाख देण्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी मान्य केले. त्यामुळे एसटी महामंडळाने नमते घेवून निवडणुकीच्या कामासाठी बसेस पुरविण्याचे मान्य केले.