आरटीईचे अंतीम प्रवेश ३१ ऑगस्टपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST2020-08-23T05:00:00+5:302020-08-23T05:00:38+5:30
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सोडत (लॉटरी) १७ मार्च रोजी काढण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांना लॉटरी लागली आहे त्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चीत करावयाचा आहे. त्यानंतर लॉटरी लागलेल्या कोणत्याही बालकास प्रवेश दिला जाणार नाही.

आरटीईचे अंतीम प्रवेश ३१ ऑगस्टपर्यंत
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सन २०२०-२१ च्या आरटीईच्या २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेण्याची शेवटची तारीख निश्चीत करण्यात आली आहे. तर त्यानंतर १ सप्टेंबर पासून वेटींगवर असलेल्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सोडत (लॉटरी) १७ मार्च रोजी काढण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांना लॉटरी लागली आहे त्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चीत करावयाचा आहे. त्यानंतर लॉटरी लागलेल्या कोणत्याही बालकास प्रवेश दिला जाणार नाही. तसेच ३१ ऑगस्ट नंतर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता पडताळणी समितीकडे पालकांनी गर्दी करू नये, ज्या बालकांना लॉटरी लागली आहे त्या शाळेत ३१ ऑगस्टच्या आत जाऊन प्रवेश निश्चीत करावा. प्रवेश निश्चीत करणे शक्य नसल्यास ई-मलेद्वारे कागदपत्र शाळेत पाठवून दुरध्वनीद्वारे शाळेतील मुख्याध्यापकांशी संपर्क करून पालकांनी प्रवेश निश्चीत करावा. शाळांनी त्यांना आरटीई पोर्टलवर जी यादी प्राप्त झाली आहे त्या यादीतील अद्याप शाळेत प्रवेशासाठी न आलेल्या बालकांच्या पालकांना दुरध्वनी व ई-मेलद्वारे संपर्क साधून त्यांच्या प्रवेशाची कार्यवाही ३१ ऑगस्टच्या आत पूर्ण करावी अशा सूचना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजकुमार हिवारे यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात ९०३ विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा आहे. यापैकी ७२९ विद्यार्थ्यांनी ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित १७४ विद्यार्थ्यांचे पालक आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चीत करण्यासाठी अद्याप शाळेत गेले नाहीत.