विनाकारण फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:27 IST2021-05-24T04:27:57+5:302021-05-24T04:27:57+5:30

गोंदिया : कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही नियम तयार केले. परंतु, या नियमांची पायमल्ली करत विनाकारण फिरणाऱ्यांवर ...

Filing of crimes against pedestrians without any reason | विनाकारण फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल

विनाकारण फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल

गोंदिया : कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही नियम तयार केले. परंतु, या नियमांची पायमल्ली करत विनाकारण फिरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये शहरातील जयस्तंभ चौकात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस हवालदार किसन बरैया यांनी गुन्हा दाखल केला आहे. दुसरी कारवाई रावणवाडी येथील त्रिमूर्ती चौकातील असून, नाईक पोलीस शिपाई ईश्वर कन्हैयालाल ढेकवार यांनी केली आहे. तिसरी कारवाई पोलीस शिपाई संजय पुरनलाल कटरे यांनी केली असून, चौथी कारवाई रामनगर ठाण्यांतर्गत कुडवा चौक येथे पोलीस शिपाई राहुल वनवे यांनी केली आहे. संबंधित पोलीस ठाण्यांत आरोपींविरूध्द भादंविच्या कलम १८८, २६९ सहकलम ५१ (ब) आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ सहकलम ११ महाराष्ट्र कोविड विनियम २०२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Filing of crimes against pedestrians without any reason