दोन गटांत हाणामारी, पाच जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:35 IST2021-09-08T04:35:21+5:302021-09-08T04:35:21+5:30

बारनबाई मितेश्वर नागरीकर (६५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी ममता महिंद्र नागरीकर (३०), निर्मला नारायण नागरीकर (५५) व नरेंद्र नारायण ...

Fighting in two groups, five charged | दोन गटांत हाणामारी, पाच जणांवर गुन्हा दाखल

दोन गटांत हाणामारी, पाच जणांवर गुन्हा दाखल

बारनबाई मितेश्वर नागरीकर (६५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी ममता महिंद्र नागरीकर (३०), निर्मला नारायण नागरीकर (५५) व नरेंद्र नारायण नागरीकर (३०, सर्व रा. छोटा गोंदिया) यांनी ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता बारन यांच्या मुलाला शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. त्या तिघांवर शहर पोलिसांनी भादंवि कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर ममता महिंद्र नागरीकर (३०, रा. छोटा गोंदिया) यांच्या तक्रारीनुसार आरोपी डेनिम मितेश्वर नागरीकर (४०) व गिरीश मीतेश्वर नागरीकर (३३) या दोघांनी दुपारी १ वाजता शिवीगाळ करून ममताच्या पोटावर लाथ मारून ठार करण्याची धमकी दिली. त्यामुळे दोघांवर भादंवि कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...............

भांडण सोडविण्यास गेलेल्या वृद्धेला मारहाण

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम चुटिया येथील शोभेलाल गोपीचंद शरणागत (६२) हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता त्यांना आरोपी अंकुश गणीराम कावळे (२४, रा. छोटा गोंदिया) याने थापड-बुक्क्यांनी मारहाण करून ठार करण्याची धमकी दिली. शोभेलाल यांचा पुतण्या राजकुमार धनलाल शरणागत (३१) याच्यासोबत धक्काबुक्की करीत असताना ते मध्यस्थी करण्यासाठी गेले असताना त्यांना मारहाण करण्यात आली. अंकुश कावडेविरुद्ध शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

.....................

Web Title: Fighting in two groups, five charged